रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना हार्ट अटॅक?

बेडरुममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना हार्ट अटॅक?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पुतिन यांना कार्डिएक अरेस्ट येऊन ते रुममध्ये खाली कोसळले होते, असं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे. WION च्या बातमीनुसार, क्रेमलिन इनसायडर नावाच्या एका टेलिग्राम चॅनेलने याबाबत माहिती दिली आहे.एका सुरक्षा कर्मचाऱ्याला पुतिन बेडरुममध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पुतिन यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता.त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले.२२ ऑक्टोबर रोजी ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. पुतिन यांना त्यांच्या निवासस्थानी असलेल्या एका विशेष वैद्यकीय सुविधा असलेल्या आयसीयूमध्ये हलविण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.क्रेमलिनच्या एका माजी अधिकाऱ्याचं हे टेलिग्राम चॅनेल असून व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्याच या चॅनेलद्वारे सांगण्यात आलं.रविवारी संध्याकाळी त्यांच्या मॉस्को येथील खाजगी अपार्टमेंटमध्ये व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आला.

हे ही वाचा:

नाशिकच्या गिरणा नदीत सापडलं कोट्यवधींचं ड्रग्ज

चॅटजीपीटीने लिहिलं काही क्षणात गाणं; बँडने केला लाईव्ह परफॉर्मन्स

चेपॉकमध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानला चेपले

शेतजमिनीच्या वाटणीतून चुलत भावाची हत्या!

या माहितीनुसार, बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या पुतिन यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. ताबडतोब डॉक्टरांना पाचारण करण्यात आले आणि नंतर डॉक्टरांनी पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं.याआधीही याच टेलिग्राम चॅनेलने पुतिन यांच्या आरोग्याबाबत असेच अपडेट्स दिले होते, ज्यापैकी अनेक चुकीचे सिद्ध झालेले आहेत.दरम्यान पुतीन यांच्या आरोग्याबाबत कोणतीही बातमी समोर आलेली नाही. मात्र, हृदयविकाराच्या झटक्याच्या बातमीने सर्वत्र चर्चा होत आहे.

 

Exit mobile version