आता केजरीवाल म्हणतात नोटेवर गांधीजींसोबत लक्ष्मी-गणेशाचे चित्र छापा

आता केजरीवाल म्हणतात नोटेवर गांधीजींसोबत लक्ष्मी-गणेशाचे चित्र छापा

भारतीय चलनावर महात्मा गांधी यांच्या बरोबरच अन्य नेत्यांचाही फोटो छापावा, अशी मागणी जोर धरू लागली आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनाबाबत केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे. भारत एक विकसित देश व्हावा अशी आपली सर्वांची इच्छा आहे, परंतु देवी-देवतांची कृपा असेल तेव्हाच प्रयत्न यशस्वी होतात. त्यामुळे भारतीय चलनावर राष्ट्रपती महात्मा गांधींच्या फोटोच्या दुसऱ्या बाजूला लक्ष्मी-गणेश जी अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे.

बुधवारी पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.अरविंद केजरीवाल यांनी मुस्लिम देश इंडोनेशियाचे उदाहरण देत सांगितले की, इंडोनेशिया हा मुस्लिम देश आहे, परंतु त्या देशाच्या चलनाच्या एका बाजूला गणेशजींचे चित्र आहे. मग आपणही तेच करू शकतो. अरविंद केजरीवाल म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील, पण त्यासोबत देवी-देवतांच्या आशीर्वादाचीही गरज आहे.

हे ही वाचा:

बॉल समजून मुलं बॉम्बशी खेळत होती.. जीवावर बेतले

गुगलला पुन्हा एकदा दणका

नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला । क्षण जीवावेगळा न करी मज

मुहूर्ताच्या सौद्यांत गुंतवणुकदारांनी साजरी केली नफ्याची दिवाळी

केजरीवाल म्हणाले की, भारतीय चलनावर लक्ष्मी-गणेशाचे चित्र असेल तर संपूर्ण देशाला त्यांचा आशीर्वाद मिळेल. माता लक्ष्मी ही समृद्धीची देवी मानली जाते. गणेशजींना विघ्नहर्ता म्हणतात. अरविंद केजरीवाल म्हणाले की, भारतीय चलनाच्या एका बाजूला गांधीजींचा फोटो आहे, तो तसाच राहू द्या. दुसरीकडे गणेश आणि लक्ष्मी यांचे चित्र लावावे.

डॉ. बाबासाहेबांचा फोटो का नाही
नोटेवर महात्मा गांधींसोबत डॉ. बाबासाहेबांचा फोटो का नाही? असा ट्वीट काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी केले आहे. राऊत यांनी देखील नोटांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो छापण्याची मागणी केली आहे.

हिंदू महासभेची देखील मागणी 

हिंदू महासभेने देखील भारतीय चलनात गांधींच्या जागी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो लावावा अशी मागणी केली आहे.नेताजी सभेचंद्र बोस यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान गांधींपेक्षा कमी नव्हते, असे हिंदू महासभेचे कार्याध्यक्ष चंद्रचूड गोस्वामी यांनी म्हटले आहे. त्यामुळे नेताजींचा आदर करणे आवश्यक आहे. नेताजींचा सन्मान करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे चलनात गांधींच्या जागी नेताजींचा फोटो लावण्यात यावा असं मत गोस्वामी यांनी व्यक्त केलं आहे.

Exit mobile version