अल्लू अर्जुनचा बहुचर्चित चित्रपट पुष्पा २ द रूल येत्या ५ डिसेंबरला रीलिज होत आहे. मात्र त्यापूर्वीच त्याची बहुसंख्य तिकिटे बुक झाली आहेत. रीलिज होण्यापूर्वीच जवळपास १०० कोटींची कमाई या चित्रपटाने तिकिटातूनच केली आहे. लोकांनी दिलेला हा प्रतिसाद लक्षात घेता चित्रपट निर्मात्यांनी लोकांचे आभार मानले आहेत आणि या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
सुकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा पहिला शो ५ डिसेंबरला विविध भाषांत केला जाणार आहे. त्यासंदर्भातील पोस्टमध्ये लिहिले आहे की, पुष्पा-२ द रूलसाठी लोकांनी केलेल्या ऍडव्हान्स बुकिंगमधून १०० कोटींची घसघशीत कमाई करण्यात आली आहे. एक भव्य चित्रपट अनेक विक्रम मोडणार आहे.
हे ही वाचा:
विनय आपटे प्रतिष्ठानच्या लघुपट स्पर्धेचे पारितोषिक वितरण
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल
एकनाथ शिंदेंशी कोणतेही मतमतांतर नाही…आमचा शपथविधी दिमाखदार होईल
या चित्रपटासाठी जवळपास ४०० कोटींचे बजेट होते. मात्र हा चित्रपट १००० कोटींचा व्यवसाय करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी ३०० कोटींचे मानधन घेतले आहे. याआधी आलेल्या पुष्पा या पहिल्या भागासाठी त्याने ४५ कोटी घेतले होते. मात्र त्यातून मिळालेल्या तुफान प्रसिद्धीमुळे त्याची लोकप्रियता शिगेला पोहोचली.
जवळपास १० लाख तिकिटांची विक्री झालेली आहे. विशेषतः तेलुगू आणि हिंदी भाषेतील चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या आहेत. या चित्रपटात एका चंदन तस्कराची कथा दाखविण्यात आली आहे. आयकॉन स्टार अल्लूने ही भूमिका केली असून त्याच्यासोबत रश्मिका मंदाना ही त्याची नायिका म्हणून पुन्हा एकदा दिसणार आहे. गणेश आचार्य यांची कोरिओग्राफी हे या चित्रपटाचे विशेष आहे. मराठी अभिनेता श्रेयस तळपदे याने अल्लू अर्जुनसाठी दुसऱ्या भागातही हिंदीतील डबिंग केले आहे.