25 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषपुष्पा २ चा टिझल रिलिज झाला...गळ्यात लिंबांच्या माळा, निळे शरीर...अल्लू अर्जुनचा नवा...

पुष्पा २ चा टिझल रिलिज झाला…गळ्यात लिंबांच्या माळा, निळे शरीर…अल्लू अर्जुनचा नवा लूक

लाखो लोकांनी पाहिला टिझर आणि पोस्टर

Google News Follow

Related

दक्षिणेतला सुपरस्टार अलू अर्जुन याच्या वाढदिवशी त्याच्या बहुचर्चित पुष्पा २ या चित्रपटाचा टिझर रिलिज झाला आणि त्यावर लाखो चाहत्यांच्या उड्या पडल्या. पुष्पाच्या पहिल्या भागाला मिळालेली अफाट लोकप्रियता लक्षात घेता दुसऱ्या भागाची प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे. त्यामुळे या दुसऱ्या भागाचा टिझर रिलिज झाल्यावर लोकांची उत्सुकता आणखी ताणली गेली. दुसऱ्या भागात अल्लू अर्जुनचा लूक भलताच वेगळा दिसतो आहे. या टिझरसोबत या फिल्मचा एक पोस्टरही रीलिज करण्यात आला त्यात अल्लू अर्जुन एका वेगळ्याच वेशात दिसत आहे.

 

या टिझरमध्ये एका जंगलात गोळ्या लागल्यामुळे रक्ताळलेले कपडे सापडतात ते पुष्पाचेच असल्याचे सांगितले जाते. टीव्ही चॅनेलवर त्याची चर्चा होऊ लागते. पुष्पाला मारण्यात आले आहे अशी बातमी सगळीकडे पसरते. मात्र त्याचे चाहते पुष्पा कसा सगळ्या गोरगरिबांचा रॉबिनहूड होता याचे किस्से सांगू लागतात. पुष्पाने कशी अडीअडचणीत मदत केली त्याच्या कहाण्या लोकांच्या ओठी दिसू लागतात. पुष्पा मृत्युमुखी पडला हे ऐकून लोक रस्त्यावर उतरतात आणि मग पोलिस त्यांच्यावर लाठीहल्ला, पाण्याचे फवारे मारून त्यांना पांगविण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्याच एका वाहिनीवर जंगलातील एक सीसीटीव्हीची क्लिप समोर येते. त्यात एक पट्टेरी वाघ दिसत असतो. तो थोडा पुढे येतो आणि एका माणसाला बघून मागे सरकतो. वाघाला मागे पाउल टाकायला भाग पाडणारा हा वाघ कोण असा सवाल त्यात विचारला जातो. डोक्यावरून कपडा घेतलेला हा माणूस वाघाजवळ उभा असतो. तो मागे वळतो तेव्हा तो पुष्पा असल्याचे स्पष्ट होते. याचा अर्थ पुष्पा जिवंत असतो, यावर शिक्कामोर्तब होते. पुष्पाच्या दुसऱ्या भागाच्या या टिझरने धमाल उडवून दिली आहे. काही मिनिटांतच लाखो लोकांनी तो टिझर पाहिला. अल्लू अर्जुनने या फिल्मचा पोस्टर ट्विट केल्यावर त्याला काही वेळातच २७ लाख व्ह्यूज मिळाले तर काही लाख लाइक्स केले गेले.

 

हे ही वाचा:

‘१५ कोटी रुपयांसाठी केजरीवाल १५ कोटींचे तूप असा शब्द वापरतात’

फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल अडचणीत

भिंद्रनवालेप्रमाणे दिसण्यासाठी अमृतपालने केली होती शस्त्रक्रिया

महागडी बुलेट प्रूफ एसयूव्ही करणार सलमान खानचे संरक्षण

पुष्पा द राईज या पहिल्या भागाला लोकांनी प्रचंड पसंती दिली होती त्याची दाढीवरून हात फिरविण्याची स्टाइल किंवा त्याची तिरकस चालण्याची स्टाइल यावर लोक फिदा झाले होते. अगदी परदेशातील लोकही पुष्पाच्या त्या चालीवर नाचताना दिसली. क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर आणि त्याचे कुटुंबीयदेखील पुष्पाच्या गाण्यावर थिरकताना दिसले.

 

आता दुसऱ्या भागातील पोस्टरमध्ये पुष्पा गळ्यात लिंबांची माळ, नाकात रिंग, शरीराचा रंग निळा, हातात बंदूक अशा वेशात दिसतो आहे. त्यामुळे या चित्रपटात काय असेल याची उत्सुकता ताणली गेली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा