भारतात आलेल्या सीमा हैदरची चर्चा चांगलीच रंगली होती.त्यांनतर भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजुची देखील तेवढीच चर्चा झाली.आता सीमाप्रमाणेच जवेरिया खानम ही पाकिस्तानमधील तरुणी भारतात आली आहे. जवेरिया खानम ही तरुणी भारतातील एका तरुणासोबत लग्न करण्यासाठी भारतात आली आहे.
जवेरिया खानम ही कराची येथील रहिवासी अजमत इस्माईल खान यांची मुलगी आहे. ती भारतातील कलकत्ता येथे राहणाऱ्या समीर खानसोबत गेल्या ५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. जवेरियाला भारतीय गाण्यांची खूप आवड आहे, तिने गायलेले मोह-मोह के धागे हे गाणे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. जवेरिया ही ४५ दिवसांच्या व्हिसावर भारतात आली आहे.
माध्यमांसोबत बोलताना समीर खानने सांगितले की, जवेरिया आणि त्याची प्रेमकहाणी २०१८ मध्ये सुरू झाली. तो म्हणाला, “मी २०१८ मध्ये जर्मनीहून घरी आलो होतो. तेव्हा मी माझ्या आईच्या मोबाईलमध्ये जावेरियाचा फोटो पाहिला. ती मला आवडली. तेव्हा मी माझ्या आईला सांगितले की, मला जवेरियाशी लग्न करायचे आहे. हे ऐकून माझ्या आईला आनंद झाला.”
हे ही वाचा:
रेवंथ रेड्डींकडे येणार तेलंगणच्या नव्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी
गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांना फसवणाऱ्या १०० हून अधिक साईट्सवर बडगा
देशाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय विकासात डॉ. आंबेडकर यांचे योगदान मोलाचे
विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या १२ पैकी १० खासदारांनी लोकसभेचा दिला राजीनामा!
त्यांनतर जवेरिया ही मंगळवारी ५ डिसेंबर २०२३ रोही अटारी सीमेवरून भारतात आली.जवेरियाच्या स्वागतासाठी तिचा होणारा पती समीर खान त्याचे वडील अहमद कमाल खान युसूफझाई हे उपस्थित होते.अटारी सीमेवर ढोल वाजवून जवेरियाचं स्वागत करण्यात आलं.
भारतात आल्यानंतर जवेरिया खानमने पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा तिने सांगितले की,”दोन्ही कुटुंबांच्या संमतीने मी आणि समीर जानेवारी २०२४ च्या पहिल्या आठवड्यात भारतात एकमेकांशी लग्न करणार आहोत.”