छोट्या पडद्यावर अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला असून घराघरांतील कुटुंब त्याचा आस्वाद घेऊ लागले आहेत. आता या कार्यक्रमाच्या १५व्या हंगामाचा पहिला करोडपती समोर आला आहे, ज्याचे नाव जसकरण सिंग आहे. जसकरण सिंहने एक कोटी रुपये जिंकले आहेत. मात्र सात कोटींच्या प्रश्नावर त्याला या कार्यक्रमातून माघार घ्यावी लागली. एक कोटी जिंकल्यामुळे त्या एसयूव्ही कारही मिळाली.
आयएएसची तयारी करणारा जसकरण सिंह याच्या वडिलांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. त्याचे आजोबा छोले भटुरे विकतात तर, आजी किराणा सामानाचे दुकान चालवते. या कुटुंबांना जेव्हा कोणीही विचारतात, की तुम्ही काम का करताय? तर, त्यांना केवळ एकच उत्तर दिले जाते, आम्ही हे आमच्या मुलांसाठी करत आहोत.
हे ही वाचा:
किशोरी पेडणेकर यांना अटक होणार? आर्थिक गुन्हे शाखेने ११ तारखेला बोलावले
सोमय्या प्रकरणी ‘लोकशाही’चे कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा
सरकार तर पडत नाही; निदान राजीनामे तरी द्या!
रोव्हर प्रज्ञानने घेतली चंद्राची रंगीबेरंगी छायाचित्रे
जसकरण सिंहला सात कोटी रुपये जिंकून देऊ शकेल अशा १५व्या प्रश्नाचे उत्तर मात्र देता आले नाही. ‘जेव्हा भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्ली करण्यात आली, तेव्हा भारताचे व्हॉइसरॉय कोण होते?’, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. एक कोटीचा हा प्रश्न होता. लॉर्ड कर्जन, लॉर्ड हार्डिंग्ज, लॉर्ड मिंटो आणि लॉर्ड रीडिंग हे पर्याय देण्यात आले होते. त्याचे उत्तर त्याला माहीत नव्हते पण हार्डिंग्ज आणि मिंटो यांच्यात संभ्रम होता. तेव्हा लाइफलाइन घेऊन त्याने हार्डिंग्ज हे उत्तर दिले आणि एक कोटीचे इनाम त्याला मिळाले. तेव्हा स्वतः अमिताभ बच्चन यांनी उभे राहात त्याला मिठी मारली.
जसकरणचे कुटुंबीयही हा सोहळा पाहात होते. त्यांनीही आनंद व्यक्त केला. मात्र त्यानंतरचा १५वा प्रश्न मात्र त्याला जमला नाही. पद्मपुराणात एका राजाने हरणाची शिकार केली तेव्हा हरणाने त्याला शाप देत तू १०० वर्षे वाघाच्या रूपातच राहशील असे म्हटले. तो राजा कोण, असा तो सवाल होता. मात्र उत्तर माहीत नसल्याने जसकरण सिंहने या कार्यक्रमातून माघार घेतली. प्रभंजन असे त्या राजाचे नाव असल्याचे नंतर अमिताभ यांनी सांगितले.