उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील कोसी कलान भागात वाहिद कुरेशी नावाच्या एका दुकानदाराने पंजाबी मार्केटचे नाव बदलून “इस्लामिक मार्केट” केले आणि त्याच्या कपड्यांच्या दुकानाच्या कॅरीबॅगवर तसेच नाव छापले. स्थानिक व्यापाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. या घटनेने सोशल मीडियावरही खळबळ उडाली असल्याने पोलिसांनी “ट्रेंड्स नेव्हर एंड्स” या दुकानाचे मालक वाहिद कुरेशी आणि आणखी एका कामगाराला अटक केली. एसडीएम कोर्टाने वाहिद कुरेशीचा जामीन अर्ज फेटाळला असून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
शनिवारी पंजाबी मार्केटमधील स्थानिक व्यापाऱ्यांच्या हे लक्षात आले. आरोपी वाहिद कुरेशी याने मनमानीपणे मार्केटचे नाव बदलून इस्लामिक मार्केट असे केले. हे नवीन नाव प्रसिद्ध करण्यासाठी त्याने कॅरीबॅगवर तसे नाव छापले. यानंतर विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष श्रीकांत चौधरी आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी पोलिस ठाणे गाठून पोलिस निरीक्षक अजितकुमार यांना या प्रकरणाची माहिती दिली.
हेही वाचा..
२० बंगलादेशींना ८ महिने तुरुंगवास
लोकसभा निवडणूक निकालाआधी ‘इंडी’ गट अंदाज घेणार
पापुआ न्यू गिनीमधील भूस्खलनात तब्बल २००० हुन अधिक लोकांचा मृत्यू!
वेदांतच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल करण्यासाठी पैसे पुरवणाऱ्याला अटक
त्यानंतर प्रभारी मोहित राणा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपी वाहिदच्या दुकानावर छापा टाकून त्यावर “इस्लामिक मार्केट” छापलेल्या २५ किलो कॅरीबॅग जप्त करून दुकान बंद केले. पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने आरोपी वाहिद पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी वाहिदसह एका कामगाराला पकडून पोलिस ठाण्यात आणण्यात आले. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी कामगाराला सोडून दिले मात्र आरोपी वाहिद कुरेशी याला दंड ठोठावला. दरम्यान, नगर परिषदेने आरोपींना नोटीस बजावली असून तीन दिवसांत उत्तर देण्याचे त्या नोटिशीत म्हटले आहे.
नगरपरिषदेचे कार्यकारी अधिकारी निहाल सिंग म्हणाले की, बाजार किंवा परिसराचे नाव बदलण्याचा अधिकार फक्त परिषदेला आहे.