गँगस्टर विकी गौंडर आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीविरोधात भटिंडा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भटिंडा पोलिसांनी टोळीच्या ४ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यांना अवैध शस्त्रांसह अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी एक संदीप नागरा आहे, जो सिद्धू मूसवाला प्रकरणातील आरोपी केकरा कालियावलीचा सहकारी आहे.
याबाबत भटिंडा पोलिसांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, सीआयए-१ कर्मचारी संशयास्पद व्यक्तीच्या संदर्भात गस्त घालत होते. यावेळी रिंगरोड भटिंडा येथे ४ जण मोटारसायकलवरून येत होते. त्यांना थांबवून चौकशी करण्यात आली आणि झडती घेण्यात आली. त्यांच्याकडून एक पिस्तूल देशी कट्टा ३१५ बोअर, १ रिव्हॉल्व्हर ३२ बोअर, १० राउंड ३२ बोअर, ०३ काडतुसे १२ जप्त करण्यात आली. याशिवाय काळ्या रंगाची मोटारसायकल (स्प्लेंडर) जप्त करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
शंकराचार्यांना राहुल गांधींच्या पालख्या नाचवण्याचे काम उरले आहे का?
बिहारमधील नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयकडून कथित मुख्य सूत्रधाराला अटक
इंडी आघाडीच्या नेत्यांची चौकशी करा
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईची दमदाटी!
ही शस्त्रे उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथून आणल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हरमनप्रीत सिंग उर्फ हरमन, संदीप नागरा, मनप्रीत सिंग उर्फ मन्ना आणि संदीप नागरा असे अटक करण्यात आलेल्या गँगस्टरची नावे आहेत. हरमनप्रीत सिंग हा विकी गौंडर ग्रुपशी संबंधित आहे तर मनप्रीत सिंग उर्फ मन्ना हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई ग्रुपचा सदस्य आहे.