पोलिस आतापर्यंत प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन किंवा पोलिस परेडमध्ये बँड वाजवताना दिसले आहेत पण आता लग्नातही ते बॅँड वाजवताना दिसणार आहेत.
सध्या पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता असून भगवंत मान हे मुख्यमंत्री आहेत. पोलिसांच्या या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त होत असून पोलिसांसाठी पैसेही सरकारकडे नाहीत का आणि त्यासाठी त्यांना लग्नातही बँड वाजवावा लागत आहे का, असा प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे.
आता लग्नातही पोलिस बॅँड वाजवताना दिसणार असल्याने भुवया उंचावल्या आहेत. पंजाबमधील मुक्तसरच्या पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी तशा पद्धतीचे पत्रकही जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, आता पोलिस लग्नांमध्येही बँड वाजवणार आहेत. फक्त त्यासाठी काही शुल्क त्यांना द्यावे लागणार आहे. ते शुल्क त्यांनी नमूद केले असून लोकांना आधीच पोलिसांकडून किती शुल्क आकारले जाईल हे कळावे म्हणून तशी तजवीज करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
एकावर दोन फ्री…खांदेपालटाने लावली बुडबुड्याला टाचणी
शीतल म्हात्रे व्हीडिओप्रकरणी साईनाथ दुर्गे अटकेत
आजपासून सुरू होणाऱ्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत हरीश साळवे काय बोलणार?
राज्यातील कैद्यांना आता ‘तुुडुंब’वास; सगळ्या तुरुंगात गर्दी
या पत्रकात म्हटले आहे की, खासगी कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी यांच्यासाठी वेगवेगळे दर लागू करण्यात आले आहेत. एक तासापेक्षा अधिक बँड वाजवायचा असेल तर त्यासाठी जादा शुल्क आकारले जाईल. सरकारी कर्मचाऱ्यांच्या लग्नासाठी एका तासाचे ५ हजार रुपये शुल्क आकारले जात असेल तर सर्वसामान्य लोकांसाठी एका तासासाठी ७ हजार रुपये आकारले जातील. सरकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त तासासाठी २५०० हजार रुपये तर सर्वसामान्य लोकांना अतिरिक्त तासासाठी ३५०० रुपये आकारले जाणार आहेत.
एवढेच नव्हे तर कार्यक्रम स्थळापर्यंत येण्यासाठीही प्रवास खर्च द्यावा लागणार आहे. प्रत्येक किमी मागे ८० रुपये द्यावे लागणार आहे. त्यात पोलिस ठाण्याचा एक फोन नंबरही पत्रकात नमूद करण्यात आला आहे.