राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स हा आयपीएल २०२१ चा चौथा सामना आज मुंबईच्या वानखेडे मैदानात पार पडला. राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनमुळे हा सामना अत्यंत चुरशीचा झाला, परंतु शेवटच्या चेंडूवर पाच धावा हव्या असताना संजू सॅमसन बाद झाल्यामुळे पंजाब किंग्सने हा सामना चार धावांनी जिंकला.
सामन्याची सुरवात ही पंजाब किंग्सच्या फलंदाजीने झाली. पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुल याने ९१ धावांची खेळी केली. ख्रिस गेलच्या ४० धाव आणि दीपक हुडाच्या २८ चेंडूंमधूल ६४ धावांनी त्याला साथ दिली आणि पंजाब किंग्सचा स्कोर हा २० ओव्हर्सच्या शेवटी २२१-६ असा झाला. धावांचा हा भाला मोठा डोंगर उभा करून पंजाबने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी २२२ धावांचे लक्ष्य दिले होते.
राजस्थान रॉयल्सची सुरवातच अडखळत झाली आणि त्यांचा सलामीवीर बेन स्टोक्स हा शून्य धावांवर बाद झाला. राजस्थानची दुसरी विकेट देखील २५ धावांवर गेलेली होती. मात्र कर्णधार संजू सॅमसनने ११९ धावांची खेळी करून सर्वांची उत्कंठा शिगेला नेली होती. एका ठिकाणी अशक्य वाटत असलेला विजय हा संजू सॅमसनने दृष्टीक्षेपात आणला. शेवटच्या ओव्हरमध्ये राजस्थानला १३ धावांची गरज होती. शेवटच्या दोन चेंडूंमध्ये ५ धाव जिंकायला हव्या असताना संजू सॅमसनने धावायला नकार दिला आणि शेवटच्या चेंडूंमध्ये ५ धावांचे आव्हान उभे राहिले. शेवटच्या चेंडूला षटकार मारण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवरील दीपक हुडाने संजू सॅमसनचा झेल घेतला आणि पंजाबचा ४ धावांनी विजय झाला.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात कोविड रुग्णांमध्ये घट
नितीन गडकरींच्या एका फोननंतर चार हजार ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शन हजर
अनिल देशमुखांना सीबीआयकडून समन्स
सामना जरी पंजाबने जिंकला असला तरी या सामन्यात संजू सॅमसन हा नक्कीच क्रिकेट रसिकांची मने जिंकून गेला.