पंजाबमध्ये आता पेट्रोल ९५ तर डिझेल ८३ रु. महाराष्ट्र वाट पाहतोय!

पंजाबमध्ये आता पेट्रोल ९५ तर डिझेल ८३ रु. महाराष्ट्र वाट पाहतोय!

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे, तर आता पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांनीही पंजाबमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात जाहीर केली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतरही महाराष्ट्र सरकारने मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

मुख्यमंत्र्यांनी रविवारी राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा केली असून, पंजाबमध्ये आता पेट्रोल प्रतिलिटर १० रुपये आणि डिझेल ५ रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्राच्या निर्णयानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

पंजाबमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या कमी झालेल्या किंमती रविवारी रात्री १२ वाजल्यानंतर लागू होतील, असे मुख्यमंत्री चन्नी यांनी सांगितले. राज्य सरकारच्या या कपातीनंतर पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९५ रुपये इतका होणार आहे. दुसरीकडे डिझेलचा दर ८३.७५ रुपये होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

हे ही वाचा:

एनसीबीने गोठवली १२ कोटींची मालमत्ता

सव्वा लाख कोटींची ‘दिवाळी’

अनिल देशमुखांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

ड्रग्स प्रकरणात होणार अस्लम शेख यांची चौकशी?

पंजाबमध्ये आता त्याच्या शेजारील राज्यांच्या तुलनेत पेट्रोल आणि डीझेलच्या किंमती कमी आहेत अशी माहितीही चन्नी यांनी दिली. हरियाणामध्ये ८६.५३ रुपये आणि राजस्थानमध्ये १००.४६ रुपये इतकी किंमत आहे. पंजाब सरकारने पेट्रोलवरील व्हॅट २७.२७ टक्क्यांवरून १५.१५ टक्के आणि डिझेलवरील व्हॅट १७.५७ टक्क्यांवरून १०.९१ टक्क्यांवर आणला आहे. आगामी रब्बी हंगामात शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version