पंजाब: काँग्रेस खासदार रवनीत बिट्टू यांना पोलिसांकडून अटक!

१४ दिवसांसाठी तुरुंगात रवानगी

पंजाब: काँग्रेस खासदार रवनीत बिट्टू यांना पोलिसांकडून अटक!

पंजाबमधील लुधियाना मतदारसंघातील काँग्रेस खासदार रवनीत सिंग बिट्टू यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना १४ दिवसांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले आहे.भ्रष्टाचाराचा आरोप करत लुधियाना महापालिकेच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याप्रकरणी रवनीत सिंग बिट्टू यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती.त्यांच्यासह माजी मंत्री भारत भूषण आशु,माजी जेष्ठ उपमहापौर श्याम सुंदर मल्होत्रा, जिल्हा काँग्रेस प्रमुख संजय तलवाड यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

न्यायालयाने आदेश दिल्यानंतर या सर्व काँग्रेस नेत्यांना अटक करण्यात आली.अटकेनंतर लगेचच काँग्रेसकडून कोर्टात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता, त्यावरही चर्चा रंगली आहे. जामीन मंजूर करायचा की तुरुंगात पाठवायचा याबाबतचा निर्णय न्यायाधीशांनी राखून ठेवला आहे.

हे ही वाचा:

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी म्हणाले, ‘तेलंगणात गुजरात मॉडेल राबवणार’

परिवारवादी लोक काळा पैसा लपवण्यासाठी भारताबाहेर बँक खाती उघडतात!

केंद्रात काँग्रेसची सत्ता येऊ दे मग मोदींना मारू; पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी

रविचंद्रन अश्विन धर्मशाला येथे १००व्या कसोटीसाठी सज्ज

या जामीन अर्जावर उद्या ६ मार्च रोजी न्यायदंडाधिकारी तनिष्ठा गोयल यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, बिट्टू, सुरिंदर दावर, श्याम सुंदर मल्होत्रा ​​आणि संजय तलवाड यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना तुरुंगात पाठवण्यात येणार आहे.

तसेच खासदार रवनीत सिंह बिट्टू, माजी कॅबिनेट मंत्री भारतभूषण आशु, जिल्हाध्यक्ष संजय तलवार, माजी ज्येष्ठ उपमहापौर श्याम सुंदर अरोरा यांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून तुरुंगात रवानगी करण्यात आली.

Exit mobile version