29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषपाव शतकानंतर पुण्याला खोखोचा दुहेरी मुकुट!!!

पाव शतकानंतर पुण्याला खोखोचा दुहेरी मुकुट!!!

Google News Follow

Related

पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा

महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सोलापूर हौशी खो खो असोसिएशन यांच्या मान्यतेने ५७ वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा वेळापूर (ता. माळशिरस), सोलापूर येथे झाली. या स्पर्धेत पुण्याने दुहेरी मुकुट मिळवला. या पूर्वी १९९५-९६ साली कुळगाव ठाणे येथे झालेल्या ३४ व्या पुरुष- महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुण्याने दुहेरी मुकुट मिळवला होता. पुरुष- महिला गटात दुहेरी मुकुट सहजासहजी कोणाला मिळत नाही ही गोष्ट येथे अधोरेखित होते.

या स्पर्धेतील सर्वोत्कष्ट अष्टपैलू खेळाडूसाठी असलेली राणी अहिल्या पुरस्काराची मानकरी प्रियांका इंगळे ठरली तर पुरुष गटातील राजे संभाजी पुरस्काराचा मान प्रतीक वाईकर याने मिळविला. या स्पर्धेतील तृतीय स्थान महिला गटात उस्मानाबाद आणि पुरुष गटात सांगलीने संपादन केले.

महिलांच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या पुण्याने ठाण्यावर १३-१२ असा ३.४० मिनिटे राखून विजय मिळविताना विशेष प्रयास करावे लागले नाहीत. प्रियांका इंगळे (२:००, १:४० मि. संरक्षण व ५ बळी), दिपाली राठोड (२:१०, १:०० मि. संरक्षण व २ बळी) व श्वेता वाघ (१:५०, १:५०) यांच्या शानदार खेळीमुळे पुण्याने मध्यंतरास ९-५ अशी आघाडी घेतली होती. ठाण्याच्या रेश्मा राठोड (१:५० मि. संरक्षण व ४ बळी), मृणाल कांबळे (४ बळी) व कविता घाणेकर (२:२० मि. संरक्षण) यांची खेळी अपुरी पडली.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात पुण्याने गतविजेत्या मुंबई उपनगरला १७-१६ असे एका गुणाने नमविले. ह्या सामान्यतील चुरस इतकी टोकाची होती की शेवटच्या क्षणापर्यंत खेळाडूंनी केलेल्या खेळींनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मध्यंतरापर्यंत ८-८ अशी बरोबरी झाल्यानंतर निर्णायक आक्रमणात मुंबई उपनगरचा गुण मिळविण्याचा तर पुणे संरक्षणात बचाव करण्याचा प्रयत्न करीत होता तर सर्व प्रेक्षकांचे लक्ष सामना संपल्याची पंचाची शिट्टी कधी वाजते याकडे होते. अखेर शेवटच्या मिनिटात पुण्याने बचाव करीत बाजी मारली.

पुण्याच्या मिलिंद करपे ( १:०० मि. संरक्षण व ५ गडी), प्रतीक वाईकर (१:४० मि. संरक्षण व ३ गडी) व सागर लेंग्रे (१:४० मि. संरक्षण व १ गडी) यांची अष्टपैलू खेळी संघाच्या विजयात महत्वपूर्ण ठरली. मुंबई उपनगरच्या अक्षय भोंगरे (१:१०, १:०० मि. संरक्षण व ५ गडी), अनिकेत पोरे (१:३०, १:०० मि. संरक्षण व २ गडी), ऋषिकेश मुरचावडे (१:३०, १:१० मि. संरक्षण व १ गडी) याची अष्टपैलू लढत अपुरी पडली.

हे ही वाचा:

विराट- रोहितमध्ये धुसफूस?

राहुल गांधींची शिवाजी पार्कवरची सभा रद्द

विधान परिषदेत निवडणुकीत फुटलेल्या मतांची चर्चा; भोयरना एक मत कुणाचे?

श्रीलंकेत संसद बरखास्त, संसदीय लोकशाही धोक्यात?

 

तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यात लघुत्तम आक्रमणाच्या डावात महिला गटात उस्मानाबादने रत्नागिरी वर २३ सेकंदाने तर पुरुष गटात सांगलीने ठाणेवर ११ सेकंदाने मात केली.

या स्पर्धेचे आयोजन वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळाने केले होते. पारितोषिक वितरण आमदार शहाजीबापू पाटील, बबनराव शिंदे, दीपक साळुंखे- पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर यांच्या हस्ते झाले. यावेळी भारतीय खोखो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अरुण देशमुख, माजी सचिव जे. पी. शेळके आदी उपस्थित होते. स्पर्धा सचिव जावेद मुलाणी यांनी प्रास्ताविक केले तर समाधान काळे यांनी सूत्रसंचलन केले.

सर्वोत्कष्ट खेळाडू :
पुरुष : अष्टपैलू आणि राजे संभाजी पुरस्कार: प्रतीक वाईकर (पुणे) संरक्षक: ऋषिकेश मुरचावडे (मुंबई उपनगर), आक्रमक: मिलींद कुरपे (पुणे).

महिला :अष्टपैलू आणि राणी अहिल्या पुरस्कार : प्रियांका इंगळे (पुणे), संरक्षक: श्वेता वाघ (पुणे), आक्रमक : रेश्मा राठोड (ठाणे).

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा