पुणे; वाघाच्या कातड्याची तस्करी करणारी टोळी गजाआड !

पुणे व जळगाव सीमा शुल्क विभागाची कारवाई

पुणे; वाघाच्या कातड्याची तस्करी करणारी टोळी गजाआड !

वाघाची शिकार करून वाघाच्या कातड्याची तस्करी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पुणे आणि नागपूर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणात सहा जणांना ताब्यात घेतलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या कातडीची किंमत पाच कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

नशिराबाद टोल नाका येथे वाघाच्या कातड्याची तस्करी होणार असल्याची माहिती पुणे व जळगाव सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचत सहा जणांना अटक करत त्यांच्याकडून वाघाच्या कातडीसह इतर साहित्य जप्त केले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या वाघाच्या कातडीची बाजार किंमत ५ कोटी असल्याची माहिती आहे. अजवर सुजात भोसले, मोहंमद खान, नदीम शेख, कंगनाबाई भोसले, तेवाबाई पवार, रहीम पवार, असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील मोहंमद खान हा भोपाळ राज्यातील रहिवासी असून उर्वरित सर्व अहमदनगर, जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

हे ही वाचा:

ब्राह्मणांना टार्गेट करून ऐक्य निर्माण होईल?

हिंदू तरुणाची धारावीत धारदार शस्त्राने हत्या, विश्व हिंदू परिषदेची पोलीस ठाण्यासमोर आंदोलन

त्रिपुरा: बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांना अटक !

पॅरिस ऑलिम्पिक : डिझायनर तहलीयानी म्हणाले, खेळाडूंची गणवेशनिर्मिती विचारपूर्वकच !

ताब्यात घेण्यात आलेली कातडी ही पाच फूट लांब असणाऱ्या वाघीणीची असल्याची माहिती आहे. ही वाघीण चार ते पाच वर्षांची असल्याचं सांगितलं जातंय. आंतरराष्ट्रीय बाजारात या कातडीची किंमत पाच कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी सीमा शुल्क विभागाकडून वन्यजीवन संरक्षण अधिनियम – १९७२ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पथकाकडून अधिक तपास सुरु आहे. जळगावात सापडलेल्या या प्रकरणात भोपाळ आणि त्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर काही संबंध आहे का याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

Exit mobile version