गडकरींनी ट्विट करून दिली माहिती
२०१४ सालापासून रस्ते बांधणीच्या कामाला गती मिळाली आहे. दिवसाला ५ किमी. च्या गतीने बनत असलेले रस्ते आज ३० किमी. पेक्षा जास्त गतीने बनत आहे. देशभरात रस्ते निर्मितीचा चालना मिळत असून, अनेक ठिकाणी वाहतुकीला सुसज्ज असे महामार्ग बनवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या नेतृत्वात होत आहे. आता पुणे-नाशिक महामार्ग बाह्यवळण रस्ताही तयार झाला असून, त्याचे फोटोही नितीन गडकरींनी ट्विटरवर शेअर केले आहेत. “नारायणगावातून जाणारा पुणे बायपास हा पुणे ते नाशिकदरम्यानचा प्रवास सुखकर करेल. आता कृषी उत्पादने मुंबई-पुणे मार्केटमध्ये सहज पोहोचतील,” असंही नितीन गडकरी ट्विट करत म्हणालेत.
The Narayangaon, Pune bypass will ease travel between Pune and Nashik. Agricultural products would reach Mumbai-Pune Market easily. #PragatiKaHighway pic.twitter.com/3LMVQZZYkA
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 16, 2021
नितीन गडकरींच्या कामाचा वेग हा भन्नाट आहे. पायाभूत सुविधांमधील मोठ्या बदलांमुळे भारतातील रस्तेही युरोप आणि अमेरिकेसारखे होतील, असंही गडकरींनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं. ते वक्तव्यही प्रचंड चर्चेत आलं होतं. तसेच दिल्ली-मुंबईमधील रस्त्याचे अंतर फक्त १२ तासांचे होणार असून, राज्यातील समृद्धी महामार्गाने मुंबई-नागपूरमधील अंतरही कमी होईल, असंही त्यांनी सांगितलं होतं.
हे ही वाचा:
२०२२ पर्यंत देशाच्या सर्व सीमांवर कुंपण पूर्ण होणार
मोदी-पवार भेट! कशासाठी झाली तासभर चर्चा?
ऑलिम्पिक स्पर्धेच्या ठिकाणी कोविडचा रुग्ण आढळला
‘या’ उच्च न्यायालयाचे आजपासून थेट प्रक्षेपण
पाच वर्षांपूर्वी पुणे-नाशिक महामार्ग नारायणगाव बाह्यवळण रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. तसेच खेड ते सिन्नरदरम्यानच्या नारायणगाव येथील बाह्यवळण रस्त्याचं काम २०१६ ला सुरू झाले. सुमारे पाच किलोमीटर लांब आणि साठ मीटर रुंदीच्या बाह्यवळण रस्त्याचे काम २०१८ मध्ये भूसंपादनाच्या कारणास्तव रखडले होते. त्यानंतर आता या बाह्यवळण रस्त्याचं काम पूर्ण झाले असून, पुण्यातून थेट नाशिक आणि मुंबईला पोहोचणे आता सहजशक्य होणार आहे. तसेच पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतूनही सुटका होणार आहे.