मनोरमा खेडकरांच्या बंगल्याला पुणे मनपाची नोटीस !

अतिक्रमण न हवल्यास कारवाई करण्याचे पालिकेचे आदेश

मनोरमा खेडकरांच्या बंगल्याला पुणे मनपाची नोटीस !

पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे महापालिकेने नोटीस पाठीविली आहे. पालिकेकडून मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याला नोटीस लावण्यात आली आहे. रस्त्याच्या बाजूला फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याचे पालिकेच्या नोटीसमध्ये म्हटले आहे. अतिक्रमण ७ दिवसात न हटवल्यास कारवाई करण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहेत.

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या गैरव्यवहारामुळे आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या चर्चेत आहेत. पूजा खेडकर यांच्या आयएएसपदाच्या निवडीवर देखील आता बोट ठेवले जात आहे. पूजा खेडकरनंतर त्यांच्या आई मनोरमा खेडकर या देखील चर्चेचा विषय बनल्या. याप्रकरणी पूजाची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्यासह इतर पाच जणांविरुद्ध पुणे ग्रामीण पोलिसाात गुन्हा दाखल झाला आहे.

हे ही वाचा:

शेकापच्या जयंत पाटलांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसलं!

फडणवीस फॉर्म्युलाच चालला, पवार पॅटर्न ‘फेल’ !

निवडणुकीपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये मोदी सरकारची मोठी खेळी; उप राज्यपालांकडे अधिक अधिकार

मराठा आरक्षणावरून जालन्यात तरुणीने संपवले जीवन

दरम्यान, पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याला एक नोटीस लावली आहे. पुणे मनपाच्या अतिक्रमण विभागाने ही नोटीस पाठविली आहे. रस्त्याच्या बाजूला फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याचे या नोटिशीत म्हटले आहे. बंगल्याच्या आजूबाजूवरील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहेत. ७ दिवसात अतिक्रमण न हटवल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे पुणे पालिकेच्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version