पुणे कार अपघात प्रकरणातील आरोपींची सध्या चौकशी सुरु आहे.आरोपी वेदांत अग्रवालला १४ दिवस बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे.दरम्यान, या प्रकरणाचा तपास कुठंपर्यंत आला याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.तसेच आमच्याकडील ही केस ड्रंक अँड ड्राईव्ह किंवा रॅश अँड निगलिजन्सची नसून कल्पेबल होमीसाईड म्हणजे सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची असल्याचे त्यांनी सांगितले.याशिवाय आरोपीचे दोनदा ब्लड सँपल घेण्यात आले.मात्र अद्याप रिपोर्ट आलेले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत म्हणाले की, ही घटना पहाटे २.३० च्या सुमारास घडली होती.घटना घडल्यानंतर प्राथमिक माहितीच्या आधारे सकाळी ८ च्या सुमारास स्थानिक पोलीस ठाण्यात ‘३०४ अ’ च्या गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र, घटना क्रम कळल्यानंतर त्याच दिवशी या प्रकरणात ३०४ कलम लावण्यात आले. ३०४ हे सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचे कलम आहे.
यानंतर आरोपी सज्ञान म्हणून गृहीत धरण्याची मागणी आम्ही बाल हक्क न्यायमंडळाकडे केली होती.सज्ञान करण्याची एक प्रक्रिया असते आणि त्याला वेळ लागतो.याच काळात आरोपीच्या वडिलांवर आणि पब मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.३०४ च्या अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मुलाला १४ दिवस बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे.आरोपीला सज्ञान म्हणून प्रकरण चालवावे, याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
याच काळात सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती. यामध्ये काही आरोपीना ३ दिवसीय तर काहींना ४ दिवसीय पोलीस कोठडी सुनावली होती.आम्ही दोन्ही प्रकरणे अत्यंत बारकाईने आणि संवेदनशीलतेने तपासत आहोत.या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा कोणी प्रयत्न केला का, याचाही तपास सुरु आहे.या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.तसेच कोर्टात आमची बाजू ठामपणे मांडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे आयुक्तांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, पोलिसांनी पहिल्याच एफआयरमध्ये आरोपीवर ३०४ कलम का लावले नाही, पोलीस ठाण्यात आरोपीला कोणत्या सुविधा पुरवण्यात आल्या का?, या सगळ्याची चौकशी करण्यात आल्या. पण त्यामध्ये कोणतेही तथ्य आढळून आले नाही.मात्र,याचा तपास सुरु आहे.
हे ही वाचा:
छत्तीसगडमध्ये ८ नक्षलवाद्यांना टिपले, चकमक सुरू!
भारतीय हवाई कंपनी इंडिगोला पहिल्यांदा झाला फायदाच फायदा!
वेदांत अग्रवालचा आक्षेपार्ह भाषेतला व्हिडीओ व्हायरल; जामीन मिळाल्यावर म्हटलं रॅप साँग
‘३७० जागांचा दावा हा अंदाजपंचे आकडा नाही’
ते पुढे म्हणाले की, आमच्याकडे अजून ब्लड रिपोर्ट आलेले नाहीत.सुरवातीला आरोपीचं ब्लड सँपल घेण्यात आलं होतं. ते फॉरेन्सिकला पाठवण्यात आले होते. यानंतर काही माहिती समोर येत असल्याने आम्ही ड्यु डेलिजन्स घेण्याच्या दृष्टीकोणातून आणखी एक ब्लड सँपल घेतले.आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या ब्लड टेस्टचे नमुने एकाच व्यक्तीचे आहेत की, नाही हे तपासून घेण्यास आम्ही फॉरेन्सिकला सांगितले आहे.मात्र, अद्याप याचे रिपोर्ट आलेले नाहीत.
ते पुढे म्हणाले की, तुम्ही एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, आमच्याकडे ३०४ अ , आयपीसी ड्रंक अँड ड्राइव्ह आणि रॅश अँड निगलिजन्स ऍक्टची केस नाहीये.एखाद्या व्यक्तीकडून दारूच्या नशेत गुन्हा घडला त र ३०४ अ, आयपीसीचा गुन्हा होतो. या प्रकरणात तीन वर्षाची शिक्षा होते आणि बेलेबल ऑफेन्स असतो.
पण आम्ही या प्रकरणात ३०४ कलम लावलं आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला गुन्ह्याची पूर्व कल्पना असल्याचं त्यात नमूद आहे. आपल्या हातून हत्या होऊ शकते हे आरोपीला माहीत होतं हे त्याच्या वर्तवणुकीवरून दिसून येतं, असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.ज्युवेनाईल असतानाही महागडी ऑटोमॅटिक गाडी चालवणे, एका पबमध्ये जाऊन दारू पिणे नंतर दुसऱ्या पबला जाऊन परत दारू देणे, त्यानंतर अरुंद गल्लीत गर्दी असताना, रहदारी असताना भरधाव वेगाने गाडी चालवणे याची आरोपीला माहिती होती. त्यांच्या कृत्याने जिवीतास हानी होऊ शकते, हे त्याला माहीत होते. त्यांचे दारु पितानाचे सीसीटीव्ही फुटेजही आमच्याकडे आहेत, असं अमितेश कुमार यांनी सांगितले.