राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे पुण्यात पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. १४ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२४ या काळात ‘पुणे पुस्तक महोत्सव’ आणि ‘पुणे लिट फेस्ट’ आयोजित करण्यात आला आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानात याचे आयोजन करण्यात आले असून यासाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे अनोखे असा पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानात सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत हा महोत्सव सुरू असणार आहे. यासाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे. या महोत्सवात ६०० हून अधिक पुस्तकांची दुकाने, तीन गिनीज विश्व विक्रम, मुलांचे स्वतंत्र दालन, चिल्ड्रन फिल्म फेस्टिवल, अनेक पुस्तकांचे प्रकाशन, लेखकांशी संवाद असे अनेक कार्यक्रम असणार आहेत. शिवाय वाचकांसाठी मेजवानी म्हणजे सर्व पुस्तकांवर १० टक्क्यांची सूट असणार आहे. ‘एक तास, वाचन ध्यास’ असा उपक्रमही राबवण्यात येणार असून ११ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १ हा वेळ केवळ वाचनासाठी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.