पुण्यात पुन्हा विकेंड लॉकडाऊन

पुण्यात पुन्हा विकेंड लॉकडाऊन

पुणे महापालिकेतर्फे पुन्हा एकदा विकेंड लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता शनिवार आणि रविवार हे दोन दिवस पुणे महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

कोविड १९ च्या या महामारीत सारा देश होरपळून निघत असताना त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला होता. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आला होता. पण गेले काही दिवस महाराष्ट्रात टप्प्या टप्प्याने अनलॉक सुरु करण्यात आला आहे. पण आता राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु झाली आहे. खुद्द मुख्यमंत्री ठाकरे यांनी तर थेट तिसऱ्या लाटेच्या लॉकडाऊनचेही सूतोवाच केले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता अनेक ठिकाणी खबरदारीचे उपाय करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पुणे महानगरपालिका प्रशासनाने विकेंड लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा:

महापालिकेचे खासगीकरण होतेय का?

रस्ते अपघातांचे प्रमाण २०२४ पर्यंत ५० टक्क्यांवर आणणार

‘शिकाऊ’ लायसन्ससाठी दलालांची चांदी

मविआ सरकारला आता हवीय बुलेट ट्रेन…

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली आहे. “पुणे मनपा हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील. तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार-रविवार केवळ पार्सल सेवा देता येईल.” अशी माहिती मोहोळ यांनी आपल्या ट्विटमधून दिली आहे.

Exit mobile version