भारताची एमएमए फायटर पूजा तोमरने नवा इतिहास रचला आहे.अल्टीमेट फायटिंग चॅम्पियनशिपमध्ये (यूएफसी) सामना जिंकणारी फायटर पूजा तोमर ही पहिला भारतीय महिला ठरली आहे.पूजा तोमरने ब्राझीलच्या रायने डॉस सँटोसचा पराभव केला आहे.
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील पूजाने आपल्या नावाने नवा विक्रम केल्याने देशभर तिचे कौतुक होत आहे.हा सामना अत्यंत चुरशीचा सामना होता, दोन्ही लढाऊ खेळाडूंनी आपली ताकद दाखवली.परंतु, पूजा तोमरने आपली चोख कामगिरी दाखवत ब्राझीलच्या रायने डॉस सँटोसचा पराभव केला. पूजा तोमरने ब्राझीलच्या रायने डॉस सँटोसचा ३०-२७, २७-३० आणि २९-२८ अशा गुणांसह पराभव केला आहे.
हे ही वाचा:
एअर कॅनडाच्या विमानाला टेकऑफनंतर आग; विमान सुरक्षितपणे उतरवण्यास यश!
काँग्रेसच्या प्रमुखांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण!
संगीतकार विशाल दादलानीला सोशल मीडियावर ठोकून काढले!
जम्मू काश्मीरमध्ये आयएसआय, दहशतवाद्यांची कामे करत होते सरकारी कर्मचारी!
पूजा तोमरने ऑक्टोबर २०२३ मध्ये यूएफसीसोबत तिच्या करारावर स्वाक्षरी केली होती.केंटकी येथे पार पडलेल्या स्पर्धेत तोमरने ब्राझीलच्या रायनेला धूळ चारली.पूजाने ऐतिहासिक यश मिळविले आणि यूएफसीमध्ये बाउट जिंकण्याचा मान पटकावला.दरम्यान, पूजा तोमर आतापर्यंत पाच वेळा राष्ट्रीय वुशू चॅम्पियन राहिली आहे.