अजब आहे…हॉस्पिटल म्हणते पूजा खेडकरला अपंगत्व, फिजिओथेरपि विभागाचा मात्र नकार !

पीसीएमसी आयुक्तांचे अहवालात सुधारणा करण्याचे आदेश

अजब आहे…हॉस्पिटल म्हणते पूजा खेडकरला अपंगत्व, फिजिओथेरपि विभागाचा मात्र नकार !

वादग्रस्त आयएएस प्रोबेशनरी ऑफिसर पूजा खेडकरांच्या अपंगत्व प्रकरणी पुण्यातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयाने जारी केलेल्या लोकोमोटर अपंगत्व प्रमाणपत्रात अनेक तफावत आढळून आली आहेत. यूपीएससीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्रांमध्ये फेरफार केल्याच्या आरोपाखाली छाननीला सामोरे जाणाऱ्या खेडकर यांना ऑगस्ट २०२२ मध्ये यशवंतराव चव्हाण मेमोरियल (YCM) हॉस्पिटलने ७ टक्के लोकोमोटर अपंगत्व प्रमाणपत्र जारी केले होते. मात्र, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या फिजिओथेरपी विभागाच्या अहवालात पूजा खेडकर यांना कोणतेही अपंगत्व नसल्याचे म्हटले आहे.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, पूजा खेडकर यांच्या प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्याची चौकशी सुरु झाली. या चौकशीमध्ये यशवंतराव चव्हाण रुग्णालयाने (वायसीएमएच) २५ जुलै रोजी सांगितले होते की, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात काहीही चुकीचे नसल्याचे म्हटले. मात्र, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या फिजिओथेरपी विभागाच्या अहवालात पूजा खेडकर यांना कोणतेही अपंगत्व नसल्याचे म्हटले आहे. तरीही रुग्णालय प्रशासनाने खेडकर यांना तिच्या डाव्या गुडघ्यात ७ टक्के लोकोमोटर अपंगत्व दर्शविणारे प्रमाणपत्र जारी केले. याबाबत इंडिया टुडेकडे कागदपत्रे असल्याचे म्हटले आहे, जे फिजिओथेरपी विभाग आणि रुग्णालय प्रशासनाच्या निर्णयांमधील विरोधाभास अधोरेखित करतात.

हे ही वाचा:

भारताच्या खात्यात आणखी एक कांस्य पदक; नेमबाज मनू भाकर, सरबज्योत सिंगने रचला इतिहास

‘एमपीएससी’मध्येही पूजा खेडकर प्रमाणे अनेक विद्यार्थ्यांच्या संशयास्पद भरती !

उरण हत्याकांडमधील मुख्य आरोपी दाऊदचा शोध पोलिसांनी कसा घेतला?

उद्धव ठाकरेंनी मराठा आंदोलकांकडे ढुंकूनही पाहिले नाही; आंदोलक भडकले !

दरम्यान, पूजा खेडकरच्या अपंगत्वाबाबत वायसीएम रुग्णालयाचे डीन डॉ. राजेश वाबळे यांचा तपास अहवाल पीसीएमसी आयुक्तांनी फेटाळला आहे. पीसीएमसी आयुक्त शेखर सिंह यांनी वायसीएम प्रशासनाला तपास अहवालात सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. निवासी डॉक्टरांनी पूजा खेडकर यांची तपासणी कशी केली, असा सवाल आयुक्तांनी उपस्थित केला आहे. अपंगत्वाचा निर्धार कोणत्या पुराव्या आणि चाचणीच्या आधारे करण्यात आला? वायसीएमच्या फिजिओथेरपिस्टने सांगितले की, खेडकर यांना डाव्या गुडघ्यात अपंगत्व नाही, हे सांगितल्यावर त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र कसे देण्यात आले?, असे प्रश्न पीसीएमसी आयुक्त शेखर सिंह यांनी उपस्थित केले आहेत.

Exit mobile version