26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषलेखक, संपादक आणि प्रकाशक अरुण जाखडे यांचे निधन

लेखक, संपादक आणि प्रकाशक अरुण जाखडे यांचे निधन

Google News Follow

Related

लेखक, संपादक आणि प्रकाशक अरुण जाखडे यांचे आज निधन झाले. अरुण जाखडे यांचे पुण्यात आकस्मिक निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अरुण जाखडे यांनी पद्मगंधा ही प्रकाशन संस्था सुरू करूनअनेक मान्यवर लेखकांची पुस्तके प्रकाशित केली. त्यांनी मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्षपदही भूषवले होते. याशिवाय त्यांना विविध साहित्य संस्थांचे पुरस्कारही मिळाले आहेत.

पद्मगंधा प्रकाशनातर्फे रा. चिं. ढेरे, व. दि. कुलकर्णी, गणेश देवी अशा मराठीतील अनेक लेखक-संशोधकांचे ग्रंथ प्रसिद्ध करून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. शिवाय विविध वृत्तपत्रांतून त्यांनी पाच वर्षांहून अधिक काळ सातत्याने लेखन केले आहे. त्यांच्या संपादकत्वाखाली ‘पद्मगंधा’ आणि ‘आरोग्य दर्पण’ हे दिवाळी अंक निघत असत.

पद्मगंधा प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून  त्यांनी  जगभरातील तत्त्वज्ञान आणि ललित कथांचे मराठी भाषेतील अनुवाद देखील प्रकाशित केले आहेत. यामध्ये पाउलो कोएल्हो यांची ‘द अलकेमिस्ट’ आणि ‘द जहीर’ ही पुस्तकं, जीन पॉल सार्ट्रे यांचे ‘ली मॉट्स’ टोनी मॉरिसन यांचे ‘बिलव्हड’ हे पुस्तक, ‘अगाथा खिस्ती यांची हर्क्यूल पायरट मालिका’ आणि सिमोन दी ब्यूवॉयर यांचे ‘द सेकंड सेक्स’ या पुस्तकांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहीमेची वर्षपूर्ती

दहशतवाद्याला सोडवण्यासाठी अमेरिकेत ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर हल्ला

आंतरजातीय विवाह केला म्हणून १५० दाम्पत्यांना केले बहिष्कृत

निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील रॅली, सभांवरची बंदी वाढवली

अरुण जाखडे यांनी सुरुवातीला काही काळ ‘कायनेटिक इंजिनिरिंग’मध्ये नोकरी केली. तिथून ‘ड्रिल्को मेटल कार्बाईड’मध्ये आले. मेटलर्जीच्या परीक्षा देणे शक्य व्हावे म्हणून ‘ड्रिल्को’ सोडून ते १९८२ साली ते पुण्याला ‘बजाज टेम्पो’त दाखल झाले. कारखान्यातील कामगारांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी अरुण जाखडे यांनी १९८८ मध्ये ‘पद्मगंधा’चा पहिला दिवाळी अंक काढला.

अरुण जाखडे यांनी लिहिलेली/ संपादित केलेली पुस्तके

  • भारताचा स्वातंत्र्यलढा
  • भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण
  • विश्वरूपी रबर
  • शोधवेडाच्या कथा
  • हुसेनभाई बाताड्या (कादंबरी)
  • इर्जिक (स्तंभलेखनातील लेखांचा संग्रह)
  • धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
  • पाचरुट (कादंबरी)
  • पावसाचे विज्ञान (बालसाहित्य)
  • People’s Linguistic Survey of India, दुसरा भाग – The Languages of Maharashtra – १७वा खंड (इंग्रजी, सहलेखक: गणेश देवी)
  • प्रयोगशाळेत काम कसे करावे
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा