अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे नेते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी जामिनावर बाहेर असलेले विक्रम भावे यांच्या ‘दाभोळकरहत्या आणि मी’ पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत पार पडणार आहे. या पुस्तकातून सत्य, संघर्ष आणि सत्तेच्या षडयंत्राचे काळे वास्तव उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
मुंबईतील दादर येथे रविवार, २७ एप्रिल २०२५ रोजी विशेष पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विक्रम भावे लिखित ‘दाभोळकरहत्या आणि मी’ हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. हे पुस्तक एका निरपराध हिंदू व्यक्तीच्या सत्यनिष्ठेची आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाची कहाणी आहे. या पुस्तकातून सत्य, संघर्ष आणि सत्तेच्या षडयंत्राचे काळे वास्तव उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा दावा करण्यात येत आहे.
हे ही वाचा..
लिव्हरला निरोगी ठेवण्यासाठी चांगली झोप घ्या, जंक फूड टाळा
कैलाश मानसरोवर यात्रेचे जून ते ऑगस्ट दरम्यान आयोजन
“नवा भारत कोणाला त्रास देत नाही, पण…” योगी आदित्यनाथ यांनी दिला इशारा
नितेश राणे यांच्या विधानावर काय म्हणाले अबू आजमी?
पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यकारी अध्यक्ष रणजित सावरकर, हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक हे वक्ता म्हणून उपस्थित असणार आहेत.
- स्थळ: काशीनाथ धुरू सभागृह, छबिलदास रोड, दादर रेल्वे स्टेशनजवळ, दादर (प.), मुंबई २८
- दिनांक आणि वार: रविवार, २७ एप्रिल २०२५
- वेळ: सायं. ५.३० वाजता