कोल्हापूरमधील ‘शिवाजी विद्यापीठा’च्या नामांतराची मागणी जोर धरत आहे. या विद्यापीठाला ‘छत्रपती शिवाजी महाराजां’चे एकेरी नाव असल्याने ही मागणी केली जात आहे. महाराजांच्या एकेरी नावामुळे त्यांचा अपमान होत असल्याने विविध हिंदू संघटनानकडून विद्यापिठ्याच्या नामांतराची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, ‘शिवाजी विद्यापीठा’च्या नामांतरासाठी पुन्हा एकदा जनआंदोलन होत आहे.
१७ मार्च रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. हिंदूराष्ट्र समन्वय समिती आणि हिंदू जनजागृतीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे आदरयुक्त स्वरूपात करण्याची आग्रही मागणी हिंदू संघटनेकडून करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नामांतरासाठी काढण्यात येणाऱ्या १७ मार्चच्या मोर्चेत तेलंगनाचे भाजपाचे आमदार टी.राजा. सिंह उपस्थित राहणार आहेत.
हे ही वाचा :
स्टॅलिनची सटकली, अर्थसंकल्पातून रुपयाचे चिन्ह हटवले
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी विशेष मुलांबरोबर साजरी केली होळी
१३ महिन्यांत भारतात घुसू पाहणाऱ्या २ हजारहून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक
‘केबीसी’च्या १७ व्या सीझनचे पुन्हा होस्ट असतील अमिताभ बच्चन
‘शिवाजी विद्यापीठ’ या नावात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचा अपूर्ण आणि एकेरी उल्लेख असल्याने अनेक वर्षांपासून शिवभक्त आणि हिंदू संघटनांद्वारे संताप व्यक्त होत आहे. काही शहरे, रेल्वेस्थानक, विमानतळ आणि अन्य ठिकाणी दिलेली छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची नावे नंतर आदरयुक्त करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे आदरयुक्त करावे अशी मागणी हिंदू संघटनांकडून केली जात आहे.
या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीकडून २० फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला प. पू. कालीचरण महाराज यांची उपस्थिती होती. यासोबतच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्व हिंदु परिषद, हिंदू महासभा, हिंदू एकता आंदोलन, सनातन संस्था, महाराष्ट्र मंदिर महासंघ, पतित पावन संघटना, बाल हनुमान तरुण मंडळ, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, तरुण मंडळे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.