मुंबई उच्च न्यायालयात, मुंबईत सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर यंत्रणा बसवावी आणि गरिब तसेच गरजूंना मुंबई महानगरपालिकेने मोफत मास्कचे वाटप करावे यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
सिटिझन सर्कल फॉर सोशल वेल्फेअर अँड एज्युकेशन या संघटनेच्या वतीने अध्यक्ष अर्शद अली अन्सारी यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये रेल्वे स्थानकांवर तसेच रेल्वे गाड्यांमध्ये सॅनिटायझर यंत्रणा बसवण्याची आणि रेल्वे गाड्या कटाक्षाने सॅनिटाईझ करण्याची विनंती करण्याता आली आहे. त्याबरोबरच प्रवाशांना स्टेशनवर येऊ देण्यापूर्वी त्यांचे तापमान मोजण्याची विनंती देखील करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
रामायण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
ठाण्यातील जम्बो कोविड सेंटर वापराविना
राज्य सरकारचा प्रताप! मुंबईत तीन लाख किलो डाळ सडून वाया
धन्यवाद मोदीजी! हाफकिनला कोवॅक्सीन बनवण्याची परवानगी
ही महामारी अभूतपूर्व असून याच्या विरूद्ध अतिशय आक्रमक पावले टाकण्याची गरज आहे. फक्त टाळेबंदी करून, त्याद्वारे कोरोनाची साखळी तुटेल अशी अपेक्षा करणे चुक आहे. असे मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे.
अन्सारी यांनी अनेक सार्वजनिक ठिकाणे उदा. रेल्वे स्थानक, बस थांबे यांना भेट दिल्यानंतर ही विनंती केली आहे. या जगतिक महामारीनंतर मुंबई वगळता अनेक भारतीय शहरांनी त्यांच्या सार्वजनिक जागांना सॅनिटाईझ करण्याची मोहिम राबवायला सुरूवात केली असल्याचा दावा त्यांनी त्यांच्या याचिकेत केला आहे. यासाठी अन्सारी यांनी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, भारत सरकार यांच्या डेटाचा वापर केला होता. बंगळूरू, कोईंबतूर, चेन्नई, गुवाहाटी, रायपूर, मदुराई, कोची इत्यादी शहरांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी शहरात कोरोना प्रसार रोखण्यासाठी सॅनिटायझर मशिन, मास्क मशिन यांसारख्या नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवल्या होत्या.
त्याबरोबरच, मुंबईतील अनेक मजूर रोजंदारीवर जगणारे आहेत. त्यांच्या उत्पन्नाची साधने टाळेबंदीत बंद पडल्याने महानगरपालिकेने या लोकांना मोफत मास्क वाटप करावे अशी देखील विनंती केली होती.
मुंबई महानगरपालिका मास्क न लावणाऱ्यांवर दंड आकारत आहे. या दंडातून गोळा होणारी रक्कम सॅनिटायझर मशिनसाठी वापरण्याची सूचना देखील त्यांनी केली आहे.