खर्गे-फर्गे यांना कोणी ओळखत नाही, नितीश कुमारांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा!

जेडीयूचे आमदार गोपाळ मंडल यांची मागणी

खर्गे-फर्गे यांना कोणी ओळखत नाही, नितीश कुमारांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा!

एकीकडे इंडी आघाडी विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरीकडे या पक्षांमध्ये सतत तेढ निर्माण होत असल्याचे दिसत आहे.इंडी आघाडीला यश मिळाल्यास पंतप्रधान कोण होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे.मागील काही दिवसांपूर्वी इंडी आघाडीची दिल्लीत बैठक पार पडली.या बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २०२४ मध्ये इंडी आघाडीचे सरकार आल्यास पंतप्रधान म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सुचवले.या पदासाठी मल्लिकार्जुन खर्गे योग्य उमेदवार असू शकतात असे म्हटले होते.मात्र, जेडीयूचे आमदार गोपाळ मंडल यांनी नितीश कुमारांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा अशी मागणी केली आहे.

जेडीयूचे आमदार गोपाळ मंडल यांनी नितीश कुमार यांना पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार म्हटले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक नेत्यांकडे दुर्लक्ष करत त्यांनी नितीशकुमार यांचे नाव आणि चेहरा निर्विवाद असून त्यामुळेच त्यांची पंतप्रधानपदी निवड झाली पाहिजे, असे सांगितले. गोपाळ मंडल म्हणाले की, खर्गे यांना कोणी ओळखत नाही.काँग्रेसचे काही वजन नाही आहे, असे गोपाळ मंडल म्हणाले.

हे ही वाचा:

गुलाल कोणावर उधळला जाणार, हे कोण ठरवणार?

बजरंग पुनिया ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करणार

मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊदच्या जागेचा लिलाव!

डॉ. बालाजी आसेगावकर यांना केशवसृष्टी पुरस्कार

‘खर्गे यांना कोणी ओळखत नाही’
या पक्षावर विश्वास ठेवता येणार नाही. जनता खर्गे-फर्गे यांना ओळखत नाही.आपण त्याला ओळखतही नसल्याचे ते म्हणाले.ते पुढे म्हणाले की, आता तुम्ही लोकांनी त्यांचे नाव सांगितले तेव्हा आम्हाला कळले की ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. खर्गे यांना कोणी ओळखत नाही. नितीश कुमार पंतप्रधान होतील. नितीशकुमार यांना सर्वजण ओळखतात. मात्र, खर्गे यांना कोणी ओळखत नाही, ते पुढे म्हणाले.

Exit mobile version