इस्रोकडून भारतीयांना नव्या वर्षाची भेट; XPoSAT चे यशस्वी प्रक्षेपण!

२०२४ मध्ये इस्रोच्या अनेक मोहिमा नियोजित

इस्रोकडून भारतीयांना नव्या वर्षाची भेट; XPoSAT चे यशस्वी प्रक्षेपण!

इस्रोने नववर्षाची सुरुवात दमदार केली आहे. इस्रोने ‘एक्सपोसॅट’ नावाच्या अवकाश दुर्बिणचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. इस्रोच्या पीएसएलव्ही रॉकेटचा वापर करून सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून एक्सपोसॅट उपग्रहाचे यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले. ‘एक्सपोसॅट’ उपग्रहामुळे ब्लॅक होल्स म्हणजेच कृष्णविवरांचे रहस्य उलगडणार आहे.

या मोहिमेद्वारे कृष्णविवर (आकाशगंगा) आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी विशेष उपग्रह पाठवणारा भारत हा अमेरिकेनंतर जगातील दुसरा देश ठरला. हे अभियान सुमारे पाच वर्षे चालणार आहे. या XPoSAT वर एक्स-रे पोलारिमीटर इंस्ट्रूमेंट (POLIX ) आणि एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी आणि टायमिंग (XSPECT ) नावाचे दोन पेलोड आहेत.या उपकरणांच्या माध्यमातून अवकाशातील एक्स रे – X-rays म्हणजेच क्ष किरणांच्या उगमांच्या स्त्रोतांचा अभ्यास केला जाणार आहे. यामुळे कृष्ण विवर – black hole तसंच न्यूट्रॉन तारे (neutron star) यांची सखोल निरिक्षणे केली जाणार आहेत, याबद्दलची नवी माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

हे ही वाचा:

आग्राची महिला प्रभू रामांच्या मूर्तीसाठी विणत आहे रेशीम वस्त्रे!

मशिदीत ११ वेळा ‘श्री राम जय राम, जय जय राम’ जप करा!

‘टीम इंडियाचे नक्कीच काहीतरी बिनसलेय…’

शौर्य दिनानिमित्त लाखो आंबेडकरी अनुयायी भीमा कोरेगावमध्ये दाखल
यानंतर इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी एक्सपोसॅट उपग्रहाचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण झाल्याचे सांगितले आणि देशाला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच २०२४ हे वर्ष इस्रोसाठी अनेक मोहिमांसाठी असेल असं अध्यक्ष एस सोमनाथ यांनी स्पष्ट केलं.२०२५ मध्ये इस्रो भारतीय अंतराळवीर गगनयान (Gaganyaan) मोहिमेद्वारे अवकाशात पाठवणार आहे, या मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग असलेल्या गगनयान एक आणि दोन अशा मानवविरहित मोहिमा याचवर्षी होणार असल्याची माहिती सोमनाथ यांनी यावेळी दिली. तसंच विविध उपग्रहांचे, वैज्ञानिक उपकरणांचे प्रक्षेपणही यावर्षी केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, एक्सपोसॅट सॅटलाइट बनवण्यासाठी २५० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. नासाने अशा पद्धतीच मिशन IXPE वर्ष २०२१मध्ये लॉन्च केलं होतं. त्यांना १८८ मिलियन डॉलरचा खर्च आला होता.

Exit mobile version