पाकिस्तानच्या पीएसएलचे बक्षीस महिला आयपीएलपेक्षाही कमी

लीगच्या बक्षीसाची रक्कम चर्चेचा विषय

पाकिस्तानच्या पीएसएलचे बक्षीस महिला आयपीएलपेक्षाही कमी

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीगची (पीएसएल) सुरुवात झाली. तेव्हापासून दोन्ही देशांच्या लीगची वेळोवेळी तुलना केली जाते. पीएसएलला आयपीएलपेक्षा सरस ठरवण्यासाठी पाकिस्तानी नेहमीच स्पर्धा करत असतात. पीएसएल २०२४ चा अंतिम सामना सोमवारी, १८ मार्च रोजी उशीरा खेळवण्यात आला. तेव्हापासून या लीगच्या बक्षीसाची रक्कम चर्चेचा विषय बनली आहे.

पीएसएल २०२४ चा अंतिम सामना शादाब खानचा संघ इस्लामाबाद युनायटेड आणि रिझवानचा संघ मुल्तान सुलतान यांच्यात खेळला गेला होता. विजेतेपदाच्या लढतीत इस्लामाबादने शेवटच्या चेंडूवर मुल्तानचा तीन गडी राखून पराभव केला. इस्लामाबादने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर १६० धावांचे लक्ष्य गाठले.

पीएसएलची बक्षीस रक्कम डब्ल्यूपीएलपेक्षा कमी


पीएसएलची तुलना आयपीएलशी करतात त्यांना हे जाणून आश्चर्य वाटेल की, पाकिस्तान सुपर लीगची बक्षिसाची रक्कम महिला आयपीएल म्हणजेच महिला प्रीमियर लीगपेक्षा कमी आहे. शादाब खानच्या संघाला पीएसएल २०२४ चे विजेतेपद जिंकल्याबद्दल आरसीबीच्या महिला संघापेक्षा कमी रक्कम मिळाली आहे.

पीएसएल २०२४ चे विजेतेपद जिंकल्याबद्दल इस्लामाबाद युनायटेडला सुमारे ४.१३ कोटी रुपये मिळाले होते. तर आरसीबीच्या महिला संघाला डब्ल्यूपीएल चॅम्पियन बनल्यानंतर ६ कोटी रुपये मिळाले होते. गेल्या वर्षी आयपीएल २०२३ चे विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला बक्षीस म्हणून २० कोटी रुपये मिळाले होते. म्हणजेच आयपीएलची बक्षिसाची रक्कम पीएसएलच्या बक्षीस रकमेपेक्षा जवळपास पाचपट जास्त आहे.

हेही वाचा :

गुजरात विद्यापीठात हाणामारीचे कारण फक्त नमाज नाही…

हिमाचल प्रदेशात काँग्रेसची डोकेदुखी वाढली!

४०० पार करण्याचा मार्ग दक्षिणेतून जातो!

गुजरात विद्यापीठात हाणामारीचे कारण फक्त नमाज नाही…

पीएसएल २०२४ मध्ये उपविजेत्या मुल्तान सुलतानला सुमारे १.६५ कोटी रुपये, तर आयपीएल २०२३ मध्ये उपविजेता ठरलेल्या गुजरात टायटन्सला १२.५ कोटी रुपये देण्यात आले. महिला प्रीमियर लीगबद्दल बोलायचे झाले तर दोन उपविजेत्या असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला सुमारे तीन कोटी रुपये मिळाले.

Exit mobile version