पाकव्याप्त काश्मीरमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या लोकांवर गोळीबार केल्याचेही वृत्त समोर आले आहे.पाकिस्तानच्या अत्याचाराविरोधात आज (१२ मे) दुसऱ्यादिवशीही मोठ्या संख्येने काश्मिरी लोक रस्त्यावर उतरले.दरम्यान, शनिवारी पोलिस आणि पीओकेची अवामी अॅक्शन कमिटी (एएसी) यांच्यात चकमक झाली, ज्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, वाढती महागाई, प्रचंड कर आणि विजेचा तुटवडा यामुळे ही निदर्शने करण्यात येत आहेत.जनता आणि सुरक्षा दलाचे कर्मचारी यांच्यात झालेल्या चकमकीत एका पोलिसाचा मृत्यू झाला.पीओकेमधील नागरिकांनी शनिवारी, ११ मे रोजी आंदोलनाची योजना आखली होती, परंतु एक दिवस आधी, मुझफ्फराबादमध्ये अतिरिक्त पोलिस दल बोलावून लोकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली, त्यानंतर लोकांचा रोष आणखी वाढला. याशिवाय दडियाल, मीरपूर आणि सामानी, रावळकोटसह पीओकेच्या इतर भागात चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे ‘काळू बाळूचा तमाशाच’
‘उद्धव ठाकरेंना १९९९ पासूनच मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती’
‘निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आम्हाला लोकानुनयाची गरज नाही’!
७० हून अधिक लोकांना अटक
अहवालानुसार, पाकिस्तानी सैन्याने शुक्रवारी पीओकेच्या मीरपूर जिल्ह्यातून ७० हून अधिक लोकांना अटक केली. यानंतर संतप्त जमाव रस्त्यावर उताराला. अटकेच्या निषेधार्थ, सामान्य जनतेने सुरक्षा दलांवर दगडफेक केली आणि अनेक ठिकाणी चकमकी झाल्या. परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.पीओकेमधील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी सोमवारी तातडीची बैठक बोलावली. वृत्तानुसार, राष्ट्रपतींनी पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत.