देशभरात आज, २९ जून रोजी बकरी ईद साजरी होणार असून या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आता रहिवासी संकुलांमध्ये बकऱ्यांची कत्तल करता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने या संबंधीच्या याचिकेवर सुनावणी घेत हा मोठा निर्णय दिला आहे. या निर्देशांचे पालन न झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रहिवाशी संकुलात प्राण्यांच्या कत्तलीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने तातडीनं सुनावणी घेतली. तसेच निवासी संकुलात विनापरवानगी प्राण्यांची कत्तल करण्यास मज्जाव असेल असे निर्देशही दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केल्यास कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलीस आणि मुंबई पालिकेला देण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
टोमॅटोचे दर गगनाला का भिडले आहेत?
‘रस्त्यावरील मॅनहोलचे झाकण’ चोरी करणारे पोलिसांकडून ‘जेरबंद’!
गुरुदक्षिणा देण्याच्या मूडमध्ये मोदी
भारतीय लष्कराची क्षमता पाहून चीनला भरली धडकी, नियुक्त केले तिबेटी सैनिक
गिरगावातील हरेश जैन आणि अपेक्षा शाह या दोन रहिवाशांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. खुल्या जागेत जनावरांची कत्तल केल्याने आनेक प्रकारचे प्रदूषण तसेच आजार पसरण्याचा धोका याचिकेत करण्यात आला होता. त्यांनी प्रथम पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, तिथे फारसा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे त्यांनी सांगितलं.