देशामध्ये कोविडची दुसरी लाट आल्याने कोविडच्या रुग्णसंख्येत मोठीच वाढ झाली आहे. यापैकी अनेक रुग्णांना रेमडेसिवीसारखी औषधे लागत आहेत. अचानक रुग्णवाढ झाल्याने या औषधाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता, परंतु केंद्र सरकारने वेगाने हालचाली करून देशातील एकूण रेमडेसिवीरचे उत्पादन सुमारे ११९ लाख प्रतिमहिना किंवा १ कोटी १९ लाखांपर्यंत वाढवले आहे.
देशातील कोविडच्या दुसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी, अनेक रुग्णांना या औषधाची गरज भासली आहे. त्यानंतर केंद्राने या औषधाचे उत्पादन वाढवण्यासाठी वेगाने हालचाली केल्या होत्या. त्यामुळेच या औषधाचे उत्पादन करणाऱ्या क्षेत्रांत मोठी वाढ झाली आहे. सिप्ला, डॉ. रेड्डीज लॅब, हेटेरो, जुबिलंट फार्मा, मयलान, सिंजिन आणि झायडस कॅडिला या सात मोठ्या उत्पादनकांना अमेरिकेतील जिलियड लाईफ सायन्स या कंपनीने रेमडेसिवीरच्या उत्पादनाचे ‘व्हॉलन्टरी लायसन्स’ दिले आहे. त्यासोबतच उत्पादन वाढवण्यासाठी केंद्राने ३८ नव्या स्थानांना देखील परवानगी दिली होती. त्यामुळे देशातील एकूण उत्पादकांची संख्या २२ वरून वाढून ६० पर्यंत पोहोचली आहे.
हे ही वाचा:
अरबी समुद्रात वादळे जागतिक तापमानावाढीमुळे?
तौक्ते वादळ: मुंबईत दोन तासात १३२ झाडं पडली
ऑक्सिजन, लसींच्या साठ्याचे ठाकरे सरकारने काय केले, ते कळलेच पाहिजे
संजय पांडे दोन दिवस रजेवर गेल्याने वादळ
त्याबरोबरच केंद्राने या उत्पादकांना रेमडेसिवीरच्या उत्पादनासाठी परदेशातूनही सहाय्य मिळावे यासाठी देखील मदत केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या औषधाच्या निर्मितीसाठी आवश्यक ती उपकरणे आणि कच्चा माल मिळावा यासाठी आपले पुर्ण प्रयत्न केले होते.
देशांतर्गत होणारा तुटवडा टाळण्यासाठी केंद्राकडून ११ एप्रिलपसून रेमडेसिवीरच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यासोबतच रेमडेसिवीर इंजेक्शन, रेमडेसिवीर एपीआय आणि बेटा साक्लोडेक्सट्रिन यांच्यावरी जकात कर देखील माफ करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने त्याशिवाय औषधाच्या समन्यायी वाटपासाठी प्रत्येक राज्याला आणि केंद्रशासित प्रदेशाला रेमडेसिवीरच्या मात्रा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याबरोबरच राज्याला आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या क्षेत्रातील रेमडेसिवीरचे योग्य वाटप करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. यामध्ये खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांना देखील योग्य मात्रा देण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.