जवाहरलाल नेहरू विद्यापीठ पुन्हा एकदा वादग्रस्त घोषणाबाजीमुळे चर्चेत आले आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (६ डिसेंबर) रात्री जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये स्टुडंट्स युनियनने (जेएनयूएसयू) बाबरी मशिदीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यासोबतच जेएनयूएसयूने या काळात बाबरी मशिदीच्या पुनर्बांधणीची मागणी केल्याचेही वृत्त आहे.
जेएनयूएसयूने सोमवारी रात्री बाबरी मशिदीच्या समर्थनार्थ मोर्चा काढल्याचे वृत्त आहे. दरम्यान जेएनयू विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष साकेत मून यांनी तसेच आंदोलनात उपस्थित अन्य डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बाबरी मशीद पुन्हा उभारण्याची मागणी केली.
अहवालानुसार, निषेधाच्या वेळी अनेक आक्षेपार्ह घोषणाही देण्यात आल्या, ज्यामध्ये “नही सहेंगे हाशिमपुरा, नही करेंगे दादरी, फिर बनाओ बाबरी” यासारख्या वादग्रस्त घोषणा समोर देल्या आहेत.
हे ही वाचा:
पेप्सीकोला शिकवला धडा; बटाट्याचे पेटंट रद्द
झूम मिटिंगमध्ये ९०० कर्मचाऱ्यांना सांगितले, आज तुमचा शेवटचा दिवस
२२वी मिसाईल व्हेसल स्क्वॉड्रन ‘प्रेसिडंट स्टँडर्ड’ पुरस्काराने सन्मानित
साकेत मून यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, हाशिमपुरा आणि दादरी या त्याच जागा आहेत जिथे हिंदू मुस्लीम दंगली झाल्या होत्या. अशाच पद्धतीने बाबरीमध्येही दंगली झाल्या होत्या. तिथे अन्याय झाला होता. अशा परिस्थितीत या मशिदीला पुन्हा बनवून हा अन्याय संपवून टाकता येईल. जेएनयूएसयूच्या माध्यमातून झालेल्या या आंदोलनासाठी रात्री साडेआठ वाजता गंगा ढाबा परिसरात डाव्या विचारसरणीच्या संघटनांचे अनेक कार्यकर्ते जमा झाले. इथून सुरू झालेला हा मोर्चा चंद्रभागा होस्टेलपर्यंत गेला.