प्रियांका गांधी यांची डोळे दिपवणारी संपत्ती, बहुधा लग्नात आहेर म्हणून आईने दिली असावी!

भाजपा नेते आमदार अतुल भातखळकरांचा टोला

प्रियांका गांधी यांची डोळे दिपवणारी संपत्ती, बहुधा लग्नात आहेर म्हणून आईने दिली असावी!

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी बुधवारी (२३ ऑक्टोबर) केरळमधील वायनाडमधून लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी १२ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली. प्रियंका गांधी वड्रा यांनी जाहीर केलेल्या संपत्तीवर भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी प्रश्न उपस्थित केले आणि बहुधा ही संपत्ती प्रियंका गांधीना त्यांच्या लग्नात आईने आहेर म्हणून दिली असावी, असा टोला  लगावला.

भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रियंका गांधी यांनी खुलासा केला की, ४ कोटी २४ लाख रुपयांची जंगम मालमत्ता, ५२ हजार रुपये रोख, २ कोटी २४ लाख रुपयांचा म्युच्युअल फंड, बँकेत सुमारे ३ लाख ६० हजार रुपये आहेत, PPF खात्यात १७ लाख ३८ हजार, १ कोटी १५ लाख रुपये किमतीचे सोने आणि २९ लाख रुपये किमतीचे चांदी, होंडा आणि सीआरव्ही कार किंमत ८ लाख रुपये, २ कोटी १० लाख १३ हजार ५९८  रुपये किमतीची लागवड केलेली जमीन, शिमल्यात ५ कोटी ६३ लाख ९९ हजार रुपयांचे घर इतकी संपत्तीची माहिती त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली.

हे ही वाचा : 

‘दाना’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर १७० हून अधिक रेल्वे रद्द; कोलकातामधील विमान वाहतूक स्थगित

जम्मू- काश्मीरमध्ये १९ वर्षीय स्थलांतरित मजुरावर दहशतवादी हल्ला

पुण्यात पाण्याची टाकी कोसळून पाच कामगारांचा मृत्यू

सलमानसाठी धमकीचा संदेश पाठवणाऱ्या हुसैन शेखला ठोकल्या बेड्या

प्रियांका गांधी वड्रा यांच्या संपत्तीवरून भाजपा आमदार यांनी ट्वीटकरत संपत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अतुल भातखळकर म्हणाले, प्रियांका गांधी यांची डोळे दिपवणारी संपत्ती… बहुधा मम्मीने लग्नात आहेर म्हणून दिली असावी… जनहितार्थ जारी…

दरम्यान, प्रियंका गांधी यांची ही पहिलीच निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांचे भाऊ राहुल गांधी वायनाडमधून विजयी झाले होते. उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातूनही त्यांनी निवडणूक जिंकली. त्यांनी वायनाडची जागा सोडली आणि काँग्रेसने प्रियांका गांधी यांना पोटनिवडणुकीसाठी तिकीट दिले.

Exit mobile version