प्रियांका वाड्रा चांगल्या, राहुल गांधी शिष्ट!

कंगना राणौत यांनी भेटीदरम्यानचा आलेला अनुभव केला शेअर

प्रियांका वाड्रा चांगल्या, राहुल गांधी शिष्ट!

कंगना राणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट १७ जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अभिनेत्री कंगना राणौतने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले आहे. चित्रपटाचा नुकताच टीजर समोर आला असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची सर्वजण वाट पहात आहेत. याच दरम्यान, कंगना राणौत यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना हा चित्रपट पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे. मात्र, भेटीदरम्यान राहुल गांधींच्या वागण्यावर अभिनेत्रीने टीका केली आहे. तसेच प्रियांका वाड्रा यांचा स्वभाव राहुल गांधी यांच्यापेक्षा चांगला असल्याचे म्हटले आहे.

टाईम्स नाऊशी संवाद साधताना कंगना राणौत बोलत होत्या. कंगना राणौत म्हणाल्या, “मी खरे तर प्रियांका गांधीजींना संसदेत भेटले आणि मी त्यांना पहिली गोष्ट सांगितली, तुम्हाला ‘इमर्जन्सी’ चित्रपट बघायला पाहिजे. तुम्हाला खूप आवडेल.” यावर विनम्रतेने प्रियांका गांधी वाड्रा यांनी ‘ठीक आहे, बघू.’

प्रियांका वाड्रा यांना भेटल्यानंतर कंगनाने राहुल गांधींचीही भेट घेतली. कंगना राणौत म्हणाल्या, प्रियांका आणि राहुल खूप वेगळे आहेत. तुम्हा सर्वांना माहित आहे की, ते कसे आहेत. संसदेत माझ्याकडे पाहिले आणि हसले. त्यांच्याकडे फारसे शिष्टाचार नाहीत. यानंतरही मी त्यांना चित्रपट पाहण्यासाठी आमंत्रित करते, असे कंगना राणौत यांनी म्हटले.

हे ही वाचा : 

आदित्य ठाकरे म्हणाले, तर आम्हीही फडणवीसांचे कौतुक करू!

१९५४च्या कुंभमेळ्यात नेहरू आले आणि चेंगराचेंगरीत १००० लोक मेले!

विधानसभा निवडणूक ‘हातचा मळ’ समजण्याची चूक केली!

अलिगडमध्ये लाऊडस्पीकर हटाव मोहीम तेजीत; ११२ ठिकाणी ‘आवाज बंद’

दरम्यान, ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट १९७५ ते १९७७ या २१ महिन्यांच्या दीर्घ कालावधीची कथा आहे, ज्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अंतर्गत आणि बाह्य धोक्यांचा हवाला देत संपूर्ण देशात आणीबाणी जाहीर केली होती. कंगना व्यतिरिक्त या चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे आणि मिलिंद सोमण, महिमा चौधरी सारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत.

Exit mobile version