कुस्तीपटू प्रिया ठरली २० वर्षांखालील विश्वविजेती

अशी कामगिरी करणारी ती ठरली दुसरी भारतीय महिला खेळाडू

कुस्तीपटू प्रिया ठरली २० वर्षांखालील विश्वविजेती

जॉर्डन येथे सुरू असलेल्या कनिष्ठ कुस्ती विश्व चॅम्पियनशिपमध्ये भारताने अभूतपूर्व यश मिळवले. २० वर्षांखालील विश्वविजेतेपदी प्रिया ही दुसरी भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. अंतिम पंघलनेही जेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला आहे.

प्रियाच्या डाव्या डोळ्याच्या वर दुखापत होऊनही अविचलित न होता, तिने चांगला खेळ केला अन् सुवर्णपदकाच्या लढतीत जर्मनीच्या लॉरा सेलिव्ह कुहेनचा ५-० असा सहज पराभव केला. प्रियाला रक्तस्राव होत असल्यामुळे दोनदा खेळ थांबवावा लागला होता. मात्र प्रियाने तरीही चांगला खेळ करून आणि पायांची करामत दाखवून वेगवान हल्ला चढवत लॉरा कुहेनला हादरवून सोडले. तिला एकही गुण मिळू शकला नाही.

 

तर, अंतिम पंघल ही गेल्या वर्षी ज्युनियर जगज्जेती होणारी पहिली भारतीय महिला ठरली होती. तिनेही गुरुवारी ५३ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. तिलाही पदक जिंकण्याच्या आशा आहेत. आशियाई खेळांच्या चाचण्यांमधून विनेश फोगटला सवलत देण्याच्या निर्णयाला अंतिम पघलने आव्हान दिले होते. त्यामुळे ती चर्चेत आली होती.

 

हे ही वाचा:

दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब असल्याचा बनावट फोन

द्युती चंदवर चार वर्षांची बंदी, उत्तेजक चाचणीत ठरली दोषी

फुटिरतावादी यासिन मलिकची पत्नी पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारमध्ये

भारतीय नौदलाची INS विंध्यगिरी सज्ज; राष्ट्रपतींच्या हस्ते जलावतरण

मात्र तिच्या मागणीला तेव्हा केराची टोपली दाखवण्यात आली होती. आता मात्र अंतिमने चांगला खेळ करून सामन्यात वर्चस्व गाजवले. प्रथमच चार भारतीय महिला कुस्तीपटूंनी सुवर्णपदकाच्या शर्यतीत प्रवेश केला आहे. सविता (६२ किलो) आणि अंतिम कुंडू (६५ किलो) या दोघीही ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही गुरुवारी अपराजित राहिल्या. तर, हर्षिता ७२ किलो वजनी गटात ब्राँझपदकासाठी लढत देईल.

Exit mobile version