भारतीय अंतराळ क्षेत्रातील खासगी गुंतवणुकीमुळे उच्च-तंत्रज्ञानाच्या नोकऱ्या निर्माण होतील आणि तांत्रिक विकास सुलभ होईल. असे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी सोमवारी सांगितले.
इंडियन स्पेस असोसिएशनच्या कार्यक्रमात बोलताना डोवाल म्हणाले, “आर्थिक वाढ आणि तांत्रिक विकास हे राष्ट्रीय शक्तीचे सर्वात महत्वाचे घटक आहेत. अशा वातावरणात, राष्ट्रीय सुरक्षा आणि विकासासाठी धोरण विकसित करण्यासाठी भारत सरकार आता एकमेव भागधारक असू शकत नाहीत. राष्ट्रनिर्मिती हा एक सहभागात्मक प्रयत्न आहे. ज्यात राष्ट्रीय हित जास्तीत जास्त जोपासण्यासाठी व्यक्ती, संरचना आणि प्रणालींची सामूहिक ऊर्जा एकत्र आणणे अनिवार्य आहे. खासगी क्षेत्र हे राष्ट्र उभारणीत एक महत्वाचे क्षेत्र आहे. आतापर्यंत, सार्वजनिक क्षेत्राचे वर्चस्व असलेल्या अंतराळ क्षेत्राला खाजगी क्षेत्रासाठी खुले करणे आवश्यक आहे. ”
हे ही वाचा:
‘बंद आणि विरोध यांचा “धंदा”, गोळा होतो त्यावरच “चंदा”!’
नवाब मलिकविरोधात १०० कोटींचा दावा करणार मोहित कंबोज
चेन्नई सुपर किंग्स पुन्हा एकदा अंतिम फेरीत
“पंतप्रधान मोदींनी भारताचे स्पेस डोमेन खासगी उद्योगासाठी खुले करण्याचा निर्णय दूरदृष्टीने घेतलेला निर्णय आहे. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टाला हा निर्णय पूरक आहे. ही पावले भारताला अंतराळ क्षेत्रातील उत्पादन केंद्र बनवतील”. असंही ते म्हणाले.
“भविष्यातील संधींचा लाभ घेण्यासाठी खासगी क्षेत्रातील कंपन्यांना सक्रिय पद्धतीने संघटित करण्यात भारतीय स्पेस असोसिएशन महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.” असं डोभाल म्हणाले.