मुंबई विमानतळावर खासगी विमान कोसळले

लँडिग करत असताना धावपट्टीवर कोसळले.

मुंबई विमानतळावर खासगी विमान कोसळले

मुंबई विमानतळावर एक खासगी विमान कोसळल्याची घटना घडली. खराब हवामानामुळे हे विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे विमान विशाखापट्टणमहून मुंबईत आले होते. विमानात ६ जण होते. त्यातील तीन जण जखमी झाले आहेत. यात दोन क्रू मेंबर्स होते.

 

 

ही घटना संध्याकाळी ५ वाजून २ मिनिटांनी घडली. विशाखापट्ट्णममधून हे विमान निघाले. मुंबईत ते उतरणार असताना वातावरण खराब असल्यामुळे त्यात अडथळा आला. मुंबईत तेव्हा पाऊस कोसळत होता. त्यामुळे ते लँडिग करत असताना धावपट्टीवर कोसळले. हे विमान २७व्या रनवेवर लँड होणार होते पण ते पूर्णपणे उतरण्याआधीच कोसळले.

 

 

विमान कोसळल्यावर त्याला आग लागली. पोलिसांनी तातडीने तिथे धाव घेतली. सोबत विमानतळ प्राधिकरणचे पथक, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. सुरक्षा पथकांनी विमानातील प्रवाशांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यातून त्यांना बाहेरही काढले. त्यात तीन जण जखमी झाले आहेत. एकूण पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र या घटनेमुळे विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.

 

हे ही वाचा:

धोतराला हात घालणाऱ्या पत्रकारांचा नाद नको रे बाबा..

मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊ नयेत

कुलाब्याच्या हॉटेल बडेमियाँच्या किचनमध्ये झुरळे, उंदीर

मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध

 

मुंबईतून रोज ९०० विमानांची ये-जा होत असते. पण ही घटना घडल्यामुळे कोणतेही विमान विमानतळावर उडाले नाही. तसेच कोणतेही विमान उतरविण्यातही आले नाही. आता हे विमानतळ अडथळा मुक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाची आता चौकशी करण्यात येईल.

Exit mobile version