एकीकडे लसीकरणासाठी लस उपलब्ध नाही, असा आरोप पालिकेकडून केला जातो. पण लस खरेदीत खासगी रुग्णालये पुढे असल्यामुळे गेल्या दोन दिवसांत पालिकेला मागे टाकत या रुग्णालयांनी सर्वाधिक लसीकरण केले. २७ मे पर्यंत मुंबईत झालेल्या लसीकरणापैकी खासगी हॉस्पिटल्स आणि विविध कंपन्यांनी केलेल्या लसीकरणाचा टक्का ४९ टक्के आहे. यातून ठाकरे सरकार आणि पालिकेच्या लस खरेदीतील दिरंगाई समोर येते आहे, असा आरोप मुंबई भाजपाने केला आहे.
गेल्या दोन दिवसांत मुंबई महापालिकेच्या मोफत लसीकरण केंद्रापेक्षा खासगी रुग्णालयातूनच लोकांना लस मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. जानेवारी महिन्यात १८ तारखेपासून लसीकरणाला प्रारंभ झाला. त्यावेळी सरकारी रुग्णालयांतून लसीकरण मोठ्या प्रमाणावर होत होते. पण शुक्रवारी ४१,१८१ पैकी ६० टक्के लोकांना खासगी रुग्णालयात लस मिळाली. कोव्हिशिल्ड या लसीसाठी प्रत्येकी १००० रुपये मोजून लोकांनी लस घेतली.
हे ही वाचा:
ऑक्सिजन एक्सप्रेसने पोहोचवला २०,००० मॅट्रिक टनपेक्षा अधिक ऑक्सिजन
लेडी जिन्नापासून बंगालला वाचवा!
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेचे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात
मुंबईतील व्यापाऱ्यांनी मांडले राज्यपालांसमोर गाऱ्हाणे
प्रथमच खासगी रुग्णालयांनी लसीकरणाच्या बाबतीत वेग पकडला आहे. पालिकेच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार लवकरच आम्हीही लसीकरणाला वेगाने सुरुवात करू. शनिवारी तर खासगी लसीकरणात आणखी भर पडली. ५५,८४३ डोस शनिवारी देण्यात आले त्यापैकी ३८९२४ डोस हे खासगी रुग्णालयात दिले गेले. तर सरकारी लसीकरण केंद्रात अवघ्या १६ हजार ९१९ डोस दिले गेले.
खासगी रुग्णालयांनी थेट कंपन्यांकडून लसी घेतल्या असून कंपन्यांशी किंवा सहकारी सोसायट्यांशी करार करून त्यांना लसीकरण केले जात आहे. त्यासाठी पैसे मोजले जात आहेत.
मुंबईची २७ मे पर्यंतची आकडेवारी पाहा. @mybmc क्षेत्रांत झालेल्या लसीकरणांपैकी खासगी हॉस्पिटल व विविध कंपन्यांनी केलेल्या
लसीकरणाचा टक्का ४९ आहे.
ठाकरे सरकार आणि पालिकेच्या लस खरेदीतील दिरंगाईचे कारण लक्षात येतेय का? टक्केवारी इथून नाही तर तिथून #MahaCovidFailure pic.twitter.com/77i8MKsc8E— BJP MUMBAI (@bjp4mumbai) May 30, 2021
मुंबईतील जवळपास १२ खासगी रुग्णालयांनी थेट सिरम इन्स्टिट्यूटकडून लसी विकत घेतल्या आहेत. सुराणा हॉस्पिटलचे प्रमुख प्रिन्स सुराणा म्हणाले की, आम्ही ७५०० लोकांचे लसीकरण केले. त्यातील काही लोक हे सहकारी सोसायटीतील आहेत तर काही कंपन्यांमधील. मध्यंतरी रिलायन्स उद्योगसमुहानेही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत लसीकरणाची घोषणा केली होती.