येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत जगात तिसरा क्रमांक पटकावला आहे. येरवडा कारागृहातील कैद्यांच्या या विजयामुळे महाराष्ट्र कारागृह विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
जागतिक आंतर कारागृह बुद्धीबळ स्पर्धेत येरवडा मध्यवर्ती कारागृहाने जगात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या जागतिक बुद्धीबळ स्पर्धेमध्ये जगातील ४६ देशातील एकूण ६४ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत जगात महराष्ट्रातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना स्पर्धेत जगात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
सोमवार, १८ ऑक्टोबर झालेल्या अंतिम फेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या येरवडा मध्यवर्ती कारागृहाने एल साल्व्हाडोरचा ३-१ ने पराभव करित तॄतीय क्रमांक मिळविला आहे. तर फिलिपाईन्स ने कोलंबिया चा ३-१ ने पराभव करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
हे ही वाचा
आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका
नायजेरियात महापुराची तयारीच नसल्याने गमावले शेकडो जीव
सुशांतसिंग राजपूतच्या मैत्रिणीच्या आत्महत्येचे कारण आले समोर
बाळासाहेबांच्या शिवसेनेतील ‘या’ आमदराकडून अंधेरी पोट निवडणुक बिनविरोध करण्याची मागणी
येरवडा मध्यवर्ती कारागृहाने जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत जगात तिसरा क्रमांक आशिया खंडात द्वितीय क्रमांक आणि भारतात प्रथम क्रमांक पटाकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सर्व विजेते बंदी खेळाडू यांचे कारागृह अधीक्षक, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, शिक्षक तसेच बुद्धीबळ प्रशिक्षक व आयोजकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.