30 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
घरविशेषवादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरबद्दल पंतप्रधान कार्यालयाने मागवला अहवाल

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरबद्दल पंतप्रधान कार्यालयाने मागवला अहवाल

पंतप्रधान कार्यालयाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला

Google News Follow

Related

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात असताना मनमानी कारभार करणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची वाशीम येथे बदली करण्यात आली. मनमानी कारभार करणाऱ्या पूजा खेडकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आता पुण्यातून त्यांची बदली वाशिम येथे करण्यात आली आहे. त्यानंतर आता पूजा खेडकर यांचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडून मागवण्यात आला आहे.

पूजा खेडकर महाराष्ट्र केडरची २०२३ च्या बॅचची आयएएस अधिकारी आहे. भारतीय प्रशासकीय सेवांमध्ये स्थान मिळवण्यासाठी तिने शारीरिक अपंगत्व श्रेणी आणि इतर मागासवर्गीय (OBC) कोट्यातील लाभांचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, बुधवार, १० जुलै रोजी पंतप्रधान कार्यालयाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा अहवाल मागवण्यात आला आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून पूजा खेडकर यांचा अहवाल मागवला आहे. लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनने (LBSNAA) महाराष्ट्र सरकारकडून पूजा खेडकर यांच्याबद्दल अहवाल मागवला आहे. LBSNAA अहवाल तपासून अंतिम रिपोर्ट यूपीएससी यांच्याकडे सुपूर्द करणार आहे. आयएएस होण्यासाठी आपण अंशतः अंध असल्याचे प्रमाणपत्र पूजा खेडकर यांनी दिले होते. त्यांनी पोस्ट मिळवण्यासाठी बनावट ओबीसी जात प्रमाणपत्र दिल्याचाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

खासगी ऑडीवर व्हीआयपी क्रमांकासह तसेच लाल दिवा असल्याने पूजाची छायाचित्रे व्हायरल झाल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. सिस्टीमचा गैरवापर केल्याचा आरोप केला जात आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या सेवा वाटप यादीनुसार, पूजाने OBC आणि PWBD (बेंचमार्क अपंग व्यक्ती) श्रेणी अंतर्गत अखिल भारतीय रँक ८२१ सह आयएएस श्रेणी घेतली आहे. विशेष म्हणजे, पूजाने ओबीसी प्रवर्गांतर्गत अर्ज केला होता. ज्यात क्रिमी लेयर प्रमाणपत्रासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आठ लाख रुपये आहे. दरम्यान, पूजाचे वडील दिलीप खेडकर हे महाराष्ट्र सरकारचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांनी वार्षिक उत्पन्न ४३ लाख रुपये घोषित केलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा (LS) निवडणुकीसाठी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात अंदाजे ४० कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केलं आहे. दिलीप खेडकर यांनी अहमदनगरमधून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती.

हे ही वाचा:

‘रामसेतू’ मार्गाचे रहस्य उलगडणार, इस्रोने तयार केला समुद्राखालील नकाशा !

जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथील पोलीस चौकीवर दहशतवाद्यांचा गोळीबार!

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास बीसीसीआयचा नकार

रेव्ह पार्टीत सापाचे विष वापरल्याप्रकरणी एल्विश यादवला समन्स

युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, पूजा यांना नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) ने पहिल्यांदा २२ एप्रिल २०२२ रोजी त्यांच्या अपंगत्वाची तपासणी करण्यासाठी आणि तिने सादर केलेल्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले. एम्सने तिला सहा वेळा कॉल करूनही त्या आल्या नाहीत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा