पंतप्रधनांचे संग्रहालय या वास्तूतून एका वर्षभरात तब्बल ६.८० कोटींचा महसूल गोळा झाल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. विवेक पांडे या माहिती कार्यकर्त्याने केलेल्या अर्जानंतर त्यातून ही माहिती स्पष्ट झाली आहे. ४ जुलै २०२३ रोजी त्यांना ही माहिती मिळाली.
या संग्रहालयातून एकूण किती महसूल गोळा झाला याविषयी पांडे यांनी माहिती मागविली होती. त्यात कोणकोणत्या माध्यमातून हा महसूल प्राप्त झाला याची माहितीही मागविण्यात आली होती. पांडे यांनी जी माहिती मागविली त्यातून ६ कोटी ८० लाख १४ हजार ५८१ रुपये इतका महसूल मिळाल्याचे स्पष्ट झाले. या संग्रहालयाला भेट देणाऱ्या लोकांनी काढलेली तिकीटे, दृकश्राव्य शो, जाहिराती, उपाहारगृह यातून हा महसूल गोळा झाला आहे.
या संग्रहालयात पंतप्रधनांसोबत सेल्फी या उपक्रमातून ४२ लाख ४८ हजार ६५० रुपये तर पंतप्रधानांसोबत फेरफटका यासाठी २६ लाख ७ हजार तर पंतप्रधानांनी लिहिलेले पत्र यातून २०.८५ लाख रुपये इतकी कमाई झालेली आहे. पंतप्रधानांसोबत सेल्फी या उपक्रमात कोणत्याही पंतप्रधानांच्या प्रतिमेसह आपले छायाचित्र काढता येऊ शकते. त्यानंतर ज्या पंतप्रधानांसोबत आपण काही अंतर चालू इच्छितो त्यांच्यासोबत व्हर्च्युअल पद्धतीने आपण चालू शकतो.
हे ही वाचा:
बुलढाणा बस अपघात: चालक मद्यधुंद अवस्थेत होता
इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ; सहा गुन्हे दाखल
शरद पवारांचे भाषण म्हणजे ताकाला जाऊन भांडे लपवणे
मुंबईच्या पूर्व उपनगरातून ८० सराईत गुन्हेगार हद्दपार
भविष्य की झलकियाँ (भविष्यातील काही उपक्रम) यातून संग्रहालयाला ५६ लाख ८३ हजार इतकी रक्कम मिळाली असून ऑडिओ गाईड डिव्हाइसमधून २ लाख ४६ हजार इतका महसूल मिळाला आहे.
Pradhanmantri Sangrahalaya generates more than 6.8 crore revenue in just one year, Reveals RTI filed by me
Selfi with PM-42.48 lakhs
Walk with PM-26.07 lakh
Hand written letter from PM-20.85 lakh
VR helicopter Ride-56.83 lakhs
Audio guide- 2.4 lakh@narendramodi @narendramodi_in pic.twitter.com/Pl84SbAdi4— Dr Vivek pandey (@Vivekpandey21) July 7, 2023
पंतप्रधान संग्रहालय आहे तरी कसे?
पंतप्रधान संग्रहालय हे उच्च दर्जाचे तंत्रज्ञान असलेली एक वास्तू असून त्यात भारतीय पंतप्रधानांच्या वाटचालीचा आलेख मांडण्यात आला आहे. या माध्यमातून लोकांना आधुनिक तंत्रज्ञानातून नेतृत्व, त्या नेत्यांचा द्रष्टेपणा, त्यांनी केलेली कामगिरी यांचा एक आढावा घेता येतो.
त्रिमूर्ती भवन संकुलात हे संग्रहालय आहे. २५ एकराचा हा परिसर आहे. हे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे निवासस्थान असून तिथे नेहरू स्मृती लायब्ररीही आहे. आता त्यात भारताच्या आतापर्यंतच्या सगळ्या पंतप्रधानांचीही माहिती देण्यात आली आहे.
अशोक चक्राच्या रूपातील ही इमारत आहे. भारताच्या प्रगतीचा आलेख त्यात मांडण्यात आला आहे. या संग्रहालयात पंतप्रधानांच्या वैयक्तिक वस्तू, त्यांना मिळालेल्या भेटवस्तू, स्मृतिचिन्हे, पंतप्रधानांची भाषणे, काही जुने प्रसंग, किस्से यांचा संग्रह पाहाय़ला मिळतो.