पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन यांची प्रकृती खालावली आहे. अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिराबेन १०० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आहेत आणि तरीही त्या खूप सक्रिय आहेत. या वर्षी जून महिन्यात त्यांनी १०० वा वाढदिवस साजरा केला. यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांचे पाय धुवून आशीर्वाद घेतले होते .
हिराबेन यांच्या रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी मिळताच पंतप्रधान मोदी दुपारपर्यंत अहमदाबादला येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हिराबेन यांना बुधवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने तपासणी व उपचारासाठी येथे आणण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंतप्रधान मोदींनीही फोनवरून आईच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. हिराबेन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णालयात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांचे मुख्य प्रधान सचिव के कैलाशनाथन यूएन मेहता रुग्णालयात पोहोचले आहेत.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये असताना त्यांनी माता हीराबेन यांची भेट घेतली. विशेष म्हणजे पंतप्रधान जेव्हाही गुजरात दौऱ्यावर असतात तेव्हा ते नेहमी आई हीराबेन यांना भेटतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. हिराबेन मोदींनी कोरोनाच्या काळात लस घेऊन लोकांसमोर एक आदर्श निर्माण केला होता. कोरोनाच्या काळात लोक लस घेण्यासाठी घाबरत होते पण हिराबेनचे यांचे धाडसी हे पाऊल पाहून समाजातील अनेक लोक लस घेण्यासाठी पुढे आले. एवढेच नाही तर त्या या वयातही मतदान केंद्रावर जाऊन निवडणुकीत मतदानही करतात.
हे ही वाचा:
भातखळकरांची टीका; राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी विरोधकांचा खेळ
आदित्य, राष्ट्रवादीचा शेवाळे प्रकरणाशी काय संबंध?
पवारांचा वारकऱ्यांना संयमाचा सल्ला
सीमावर्ती बांधवाना वाऱ्यावर सोडणार नाही.. इंच इंच लढू
याआधी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी कार अपघातात जखमी झाले होते. ते आपला मुलगा, सून आणि नातवासोबत बांदीपूरला जात असताना कर्नाटकातील म्हैसूरजवळ त्यांची मर्सिडीज बेंझ कार दुभाजकाला धडकली. प्रल्हाद मोदी यांना त्यांच्या कुटुंबीयांसह जेएसएस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, मात्र त्यांना किरकोळ दुखापत झाली असून सध्या ते सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.