जगदीप धनखड यांना पंतप्रधानांचा फोन

नक्कल प्रकारणी व्यक्त केली निंदा, राष्ट्रपती मुर्मू यांचीही पोस्ट  

जगदीप धनखड यांना पंतप्रधानांचा फोन

राज्यसभेचे सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची संसदेबाहेर नक्कल केल्याच्या घटनेनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनखड यांना फोन करून झालेल्या प्रकाराबद्दल दुखः व्यक्त केले. अशाच प्रकारचा अपमान आपण गेली २० वर्षे सहन करत आहोत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनखड यांना सांगितले. झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. उपराष्ट्रपतीसारख्या घटनात्मक पदावर आणि ते सुद्धा संसदेत असा प्रकार घडणे हे निंदनीय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनखड यांना सांगितले.

हेही वाचा.. 

उपराष्ट्रपतींची नक्कल करणं तृणमूल काँग्रेस खासदाराच्या अंगलट

ईव्हीएमविरोधातील अविश्वासाचा ठराव आणण्याच्या हालचाली निष्फळ!

डॉ. हेडगेवार स्मृतीस्थळाच्या दर्शनाने ऊर्जा, प्रेरणा मिळते

तामिळनाडूत पावसाचा तडाखा, १० जणांचा मृत्यू!

मंगळवारी घडलेल्या या प्रकाराबद्द्ल सबंध देशात संतापाची लाट आहे. पश्चिम बंगालमधील कल्याण बनर्जी यांनी संसदेबाहेर सभापती जगदीप धनखड यांच्या चालण्याच्या, बोलण्याच्या पार्श्वभूमीवर नक्कल केली होती. विशेष म्हणजे कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे त्यावेळी उपस्थित होते. त्यांनी चक्क स्वतःच्या खिशातून मोबाइल काढून खासदार बनर्जी करत असलेल्या नकलेचे चित्रीकरण केले. यावेळी काही ज्येष्ठ खासदार सुद्धा उपस्थित होते. त्यांनीही हा प्रकार सुरु असताना बनर्जी यांना अडवले नाही. उलट सभापती धनखड यांची नक्कल करण्यासाठी काही खासदार बनर्जी यांना सांगत होते. हा सर्व प्रकार लाजीरवाणा होता.

या घटनेनंतर सभापती धनखड यांनी नाराजी व्यक्त केली होती. हा प्रकार अत्यंत किळसवाणा आणि निंदनीय असल्याचे धनखड म्हणाले. दिवसभर या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट होती. या संदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाजमाध्यमात आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा धनखड यांना फोन करून हि घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले.

 

Exit mobile version