हरियाणाच्या यमुनानगरची भूमी एक ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ एप्रिल रोजी येथे येणार आहेत. या विशेष दौर्यादरम्यान पंतप्रधान मोदी ८०० मेगावॅट क्षमतेच्या थर्मल पॉवर युनिटचं भूमिपूजन करणार आहेत. ही प्रकल्प योजना केवळ हरियाणासाठीच नाही तर संपूर्ण देशाच्या ऊर्जा गरजांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्याच्या ऊर्जा क्षमतेत वाढ होईल आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.
पंतप्रधानांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर यमुनानगरमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक नागरिक दिवस-रात्र परिश्रम करत आहेत. याच अनुषंगाने हरियाणाचे नगरविकास मंत्री विपुल गोयल यांनी यमुनानगरचा दौरा केला. त्यांनी स्वच्छता मोहिमेची धुरा स्वतः हाती घेतली आणि रस्त्यांवर झाडू लावून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. मंत्री गोयल यांनी दाखवून दिलं की सरकार केवळ आदेश देत नाही, तर स्वतः उदाहरणही ठेवते.
विपुल गोयल यांनी यमुनानगरच्या भाजी मंडईलाही भेट दिली, जिथे त्यांनी सामान्य नागरिकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी जनतेला आवाहन केलं की, “आपलं घर, दुकान आणि परिसर स्वच्छ ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.” त्यांनी असंही म्हटलं, “पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ‘स्वच्छ भारत’ हे स्वप्न आहे आणि तेव्हा तेच शक्य होईल, जेव्हा प्रत्येक नागरिक आपली भूमिका पार पाडेल.”
हेही वाचा..
राहुल गांधींच्या संविधानावरील वक्तव्याबद्दल सुधांशु त्रिवेदींनी हाणला टोला
भावाला अडकवण्यासाठी थेट मुख्यमंत्री योगींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
युनूस यांच्या सत्तेची लालसा बांगलादेशला जाळतेय!
उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा ७ वर्षांचा मुलगा आगीच्या कचाट्यात!
मंत्री म्हणाले की, “स्वच्छता ही केवळ एक मोहिम नाही, तर ती एक संस्कार आहे.” हा संस्कार अंगीकारल्यास आपण आपलं शहर सुंदर करू शकतो आणि पुढच्या पिढ्यांना एक निरोगी भविष्य देऊ शकतो. यमुनानगरमध्ये पंतप्रधान मोदींच्या दौर्याबाबत जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह आहे. शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात तयारी अंतिम टप्प्यात आहे. रस्त्यांना सजवले जात आहे, सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जात आहे आणि नागरिक या ऐतिहासिक दिवसाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.