पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान सुरत, भावनगर, अहमदाबाद आणि अंबाजी येथे विविध कार्यक्रमांमध्ये सुमारे २९,००० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यामध्ये गांधीनगर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून अहमदाबाद मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन यांचा समावेश आहे.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी २९ आणि ३० सप्टेंबर रोजी गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरतमध्ये ३,४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील. त्यानंतर भावनगरला जातील. दुपारी २ वाजता भावनगरमध्ये ५२०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. भावनगर येथे जगातील पहिल्या सीएनजी टर्मिनल आणि ब्राउनफिल्ड बंदराची पायाभरणी मोदींच्या हस्ते होणार आहे.
पंतप्रधान गांधीनगर स्थानकावर ३० सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता गांधीनगर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील आणि तेथून कालुपूर रेल्वे स्थानकाकडे जातील. पंतप्रधान सकाळी ११.३० वाजता अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवतील आणि कालुपूर स्टेशनपासून दूरदर्शन केंद्र मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रोने प्रवास करतील. यानंतर दुपारी बाराच्या सुमारास अहमदाबादमधील पंतप्रधान अहमदाबाद एज्युकेशन सोसायटीमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात होतील.
हे ही वाचा:
नवरात्र २०२२: सप्तशृंगी गडावर, देवीचा जागर
सिंधुदुर्ग चिपी विमानतळाला माजी खासदार बॅ. नाथ पै यांचे नाव
मोदी सरकारचा मोठा निर्णय, पीएफआय संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी
राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन करणार
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये संध्याकाळी ७ वाजता पंतप्रधान ३६व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन करतील. अहमदाबाद येथील जीएमडीसी मैदानावर रात्री ९ वाजताच्या सुमारास पंतप्रधान नवरात्रोत्सवाला उपस्थित राहणार आहेत.