माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे तिसरे पुण्यस्मरण

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे तिसरे पुण्यस्मरण

भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपाच्या संस्थापकांपैकी एक स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचा आज स्मृती दिन आहे. त्या निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वाजपेयींच्या ‘सदैव अटल’ या समाधीस्थळावर जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ‘सदैव अटल’ या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करतानाचा फोटो ट्वीट केला आहे. त्याबरोबरच त्यांनी अटलजींना श्रद्धांजली देखील ट्वीटरवरूनही वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आजच्या दिवशी ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये अटलजींच्या व्यक्तीमत्त्वाचे काही पैलू देखील उलगडून दाखवले आहेत. त्यामध्ये त्यांनी आम्ही अटलजींच्या खंबीर व्यक्तीमत्त्वाचे, त्यांच्या भाषाप्रभुत्वाचे आणि विनोदीवृत्तीचे स्मरण करतो असेही म्हटले आहे. त्याबरोबरच अटलजी देशाच्या जनतेच्या मनात सदैव जीवित असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

या प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील अटलजींना श्रद्धांजली वाहिली आहे. अटलजी सदैव आमच्या आठवणीत राहतील आणि देशाच्या विकासातील त्यांचे योगदान आणि निस्वार्थ देशसेवा आम्हाला सदैव मार्गदर्शन करत राहिल असे त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्या सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांनी देखील ट्वीटरवरून अटलजींना श्रद्धांजली वाहिली आहे.

त्याबरोबरच भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी अटलजींना श्रद्धांजली वाहताना त्यांना वक्ता दशसहस्त्रेषु म्हटले आहे.

Exit mobile version