न्यूझीलंडचे पंतप्रधान लक्सन यांनी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद !

न्यूझीलंडचे पंतप्रधान लक्सन यांनी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद !

न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. भारतातील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये फेरनिवड झाल्याबद्दल लक्सन यांनी मोदी यांचे मनापासून अभिनंदन केले.

भारत-न्यूझीलंड संबंध हे समान लोकशाही मूल्ये तसेच लोकांशी लोकांच्या दृढ संबंधांवर आधारित असल्यामुळे, भविष्यात द्विपक्षीय सहकार्याला नव्या उंचीवर नेण्याच्या वचनबद्धतेचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला. दोन राष्ट्रांमध्ये अलीकडेच उच्च-स्तरीय संपर्क आल्यामुळे द्वीपक्षिय संबंधांना चालना मिळाली असून व्यापार आणि आर्थिक सहकार्य, पशुसंवर्धन, औषधनिर्माण, शिक्षण, अवकाश यासह विविध क्षेत्रांमध्ये परस्पर हितासाठी द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर त्यांची सहमती झाली.

हेही वाचा..

पंतप्रधान मोदींचे ट्विटरवर १० करोड फॉलोअर्स झाल्याने इलॉन मस्क यांनी केले अभिनंदन !

यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा !

हवामान बदल हा कधीही स्फोट होऊ शकणारा टाईम बॉम्ब

ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंमध्ये सशस्त्र दलातील २४ जवानांचा समावेश

न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाचे हित जपल्याबद्दल मोदी यांनी लक्सन यांचे आभार मानले. भारतीय समुदायाची सुरक्षा आणि कल्याणासाठी सतत झटत राहू असे आश्वासन लक्सन यांनी दिले. दोन्ही नेत्यांनी संपर्कात राहू असे आश्वासन एकमेकांना दिले.

Exit mobile version