पंतप्रधान मोदींचा केरळ दौरा, लोकांच्या प्रचंड गर्दीने विरोधकांमध्ये भरली धडकी!

पंतप्रधान मोदींवर फुलांचा वर्षाव

पंतप्रधान मोदींचा केरळ दौरा, लोकांच्या प्रचंड गर्दीने विरोधकांमध्ये भरली धडकी!

लोकसभा निवडणुकीमध्ये नवीन विक्रम रचण्यासाठी भाजप जोरदार तयारी करत आहे.यावेळी भाजप दक्षिण भारतातून आपल्या जागा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या तीन महिन्यात तामिळनाडूला सात वेळा, केरळ आणि तेलंगणाला चार वेळा तर कर्नाटकाला तीन वेळा भेट दिली.दरम्यान, काल (१९ मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळमधील पलक्कडमध्ये रोड शो केला. पंतप्रधान मोदींचा हा रॉड शो कोट्टामैदान अंचुविलक्कू येथून सुरू झाला अन मुख्य पोस्ट ऑफिसकडे याचा शेवट आला.पंतप्रधान मोदींच्या रोड शो दरम्यान लोकांची अतोनात गर्दी होती.

लोकांचा पंतप्रधान मोदींवर पुष्पवर्षाव
पंतप्रधान मोदींनी केरळमधील कोट्टामैदान अंचुविलक्कू येथून फुलांनी सजवलेल्या ओपन-टॉप वाहनातून सकाळी १०.४५ वाजता रोड शो ला सुरुवात केली आणि त्यांचा ताफा शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसकडे निघाला. फुले, हार, पक्षाचे झेंडे, मोदींचे पोस्टर आणि पक्षाच्या टोप्या परिधान करून भाजप समर्थकांसह हजारो लोक एक किलोमीटरच्या रोड शो मार्गाच्या दोन्ही बाजूला रांगेत उभे होते. रोड शो जेव्हा या मार्गावरून गेला तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या लोकांनी ‘मोदी’, ‘भारत माता की जय’, ‘मोदीजी स्वागतम’ आणि ‘मोदी की जय’च्या घोषणा दिल्या आणि फुलांचा वर्षावही केला.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने विरोधांमध्ये दहशत
पंतप्रधान मोदींनी १५ मार्च पासून दक्षिण दौऱ्याला सुरुवात केली अन काल १९ तारखेला त्याचा शेवट झाला. या पाच दिवसांच्या कालावधीत पंतप्रधानांनी विरोधकांमध्ये दहशत निर्माण केली असून त्यांचे मिशन सुरूच राहणार आहे.

हे ही वाचा:

बुमराह सराव शिबीराला अजूनही अनुपस्थित, मुंबई इंडियन्समध्ये काय चाललंय?

पुन्हा पुन्हा स्वतःला लॉन्च का करावे लागते?

आयपीएल पहिल्या सामन्यात सूर्या तळपणार नाही?

हिंदू अल्पवयीन मुलींच्या अपहरणानंतर ८६ मुस्लिम व्यापाऱ्यांना सांगितले शहर सोडायला

पंतप्रधानांनी सोमवारी कोईम्बतूरमध्ये ३.५ किमी लांबीचा रोड शो केला. यावेळी मोदींची एक झलक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती. रोड शोच्या मध्यभागी, १९९८ मध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या रॅलीच्या काही वेळापूर्वी ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला होता, त्याच ठिकाणी पंतप्रधान मोदी देखील थांबले होते.स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वर्षी जानेवारी ते मार्चपर्यंत २० वेळा दक्षिणेकडील राज्यांचा दौरा केला आहे.दक्षिणेत भाजपने बाजी मारली तर एनडीएचा ४०० आकडा पार होणार हे निश्चित.आकडेवारीवर नजर टाकली तर दक्षिणेकडील राज्यांतील लोकसभेच्या १३१ जागांपैकी २०१९ मध्ये भाजपला केवळ २९ जागा मिळाल्या होत्या. यापैकी कर्नाटकात भाजपने २८ पैकी २५ तर तेलंगणात १७ पैकी ४ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्ये पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.

Exit mobile version