पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहीदांना वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहीदांना वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अन्य नेत्यांनी रविवारी शहीद दिनानिमित्त महानायकांना श्रद्धांजली अर्पण केली. शहीदांच्या सर्वोच्च बलिदानाची आठवण ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला.

शहीदांना नमन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आपला देश भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या सर्वोच्च बलिदानाची आठवण काढत आहे. स्वातंत्र्य आणि न्यायासाठी त्यांचा निडर संघर्ष आपल्याला सदैव प्रेरित करतो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, शहीद दिनानिमित्त मी भारत मातेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अमर सपूत भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना श्रद्धांजली अर्पण करतो. भारतमातेला परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. त्यांचे अद्वितीय साहस आणि मातृभूमीसाठी त्यागाची भावना आपल्याला सदैव प्रेरित करत राहील.

हेही वाचा..

चंदीगडमध्ये हल्ला झालेला ग्रेनेड ‘पाकिस्तानी’

दक्षिण कोरियातील २० हून अधिक जंगलांमध्ये आग!

भाजपसोबत कोणतेही मतभेद नाहीत, पक्षाध्यक्षांची निवड लवकरच

‘बांगलादेशातील हिंदूंची जबाबदारी भारताची, या कर्तव्यापासून आपण सुटू शकत नाही’

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा म्हणाले की, मातृभूमीसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना ‘शहीद दिना’ निमित्त विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. या महान क्रांतिकारकांनी सिद्ध केले की राष्ट्रप्रेमापेक्षा मोठे कोणतेही कर्तव्य नाही. त्यांच्या पराक्रम आणि तेजस्वी विचारांमुळे युवकांमध्ये देशभक्ती जागृत झाली आणि स्वातंत्र्यलढ्याची ज्वाला तेवत राहिली. केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा म्हणाले की, स्वातंत्र्याच्या लढ्यातील अमर सेनानी, भारतमातेचे वीर सपूत भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना ‘शहीद दिना’ निमित्त शतशः नमन. त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि साहसाने देशातील कोट्यवधी युवकांमध्ये स्वाभिमान निर्माण केला. त्यांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा मिळाली.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, क्रांतिकारी भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांची नावे घेतली तरी ब्रिटिशांच्या हृदयात धडकी भरायची. त्यांनी भारतमातेच्या सेवेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले आणि स्वातंत्र्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली. अशा थोर विभूतींना त्यांच्या बलिदान दिवसानिमित्त शतशः नमन. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, अमर बलिदानी भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांनी आपल्या अद्वितीय साहस आणि क्रांतिकारी विचारांद्वारे स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. त्यांच्या बलिदान दिवसानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मातृभूमीसाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांना कृतज्ञ राष्ट्र सदैव नमन करत राहील.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीदांना नमन करताना लिहिले की, भारतमातेचे सच्चे नायक भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या अद्वितीय बलिदानाला शहीद दिनानिमित्त वंदन.

Exit mobile version