पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर

खारघरमधील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी सुमारे १०.३० वाजता पंतप्रधान मुंबईच्या नौदल गोदीत आय एन एस सुरत, आय एन एस निलगिरी व आय एन एस वाघशीर या नौदल युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करतील. त्यानंतर दुपारी सुमारे ३.३० वाजता ते नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करतील.

तीन प्रमुख नौदल लढाऊ जहाजे कार्यरत करणे ही संरक्षण उत्पादन आणि सागरी सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये जागतिक नेतृत्व करण्याच्या भारताच्या दृष्टीकोनातून घेतलेली एक उत्तुंग झेप आहे. आयएनएस सूरत P15B हे मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक प्रकल्पातील चौथे आणि सर्वोत्तम जहाज असून जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक आहे. यातील ७५ टक्के सामग्री स्वदेशी असून अत्याधुनिक शस्त्र-सेन्सर पॅकेजेस आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमतांनी ते सुसज्ज आहे.

हेही वाचा..

पुडुचेरीत एका मुलाची एचएमपीव्ही चाचणी पॉझिटिव्ह

बीएसएफने बांगलादेशींचा बंगालमधील घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

पूर्व लडाखमधील एलएसीजवळ चीनकडून सराव

दलित मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी २३ जणांना अटक

आयएनएस निलगिरी हे P17A स्टेल्थ फ्रिगेट प्रकारातील पहिले जहाज असून भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन विभागाने त्याची निर्मिती केली आहे तसेच त्यात उत्कृष्टपणे संकटकाळी तगून रहाण्याची क्षमता असून सागरी सुरक्षा (सीकीपिंग) आणि स्टील्थसाठी प्रगत वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत. जे स्वदेशी फ्रिगेट्सच्या आधुनिक प्रकाराचे प्रतिबिंब दर्शवितात. आयएनएस वाघशीर P75 स्कॉर्पीन प्रकल्पाची सहावी आणि अंतिम प्रकारातील पाणबुडी असून पाणबुडी बांधणीतील भारताच्या वाढत्या कौशल्याचे ती प्रतिनिधित्व करते. फ्रान्स नौदलाच्या समूहाच्या सहकार्याने तिची बांधणी करण्यात आली आहे.

भारताच्या सांस्कृतिक वारशाला चालना देण्याच्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान उद्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिर, खारघर, नवी मुंबई येथील इस्कॉन प्रकल्पाचेही उद्घाटन करतील. नऊ एकरांवर वसलेल्या या प्रकल्पात अनेक देवदेवतांची मंदिरे, वैदिक शिक्षणाचे केंद्र, प्रस्तावित वस्तुसंग्रहालय, सभागृह, आणि उपचार केंद्र यांचा समावेश आहे. विश्वबंधुत्व, शांतता आणि सौहार्द वाढवणे हे वैदिक शिक्षण केंद्राचे उद्दिष्ट आहे.

Exit mobile version